Sana says, enjoying the roles as a result of joy! | सना म्हणते, ​स्वभावानुसार भूमिका मिळाल्याने आनंदच !

अलिकडेच ‘खजूर पे अटके’ चित्रपटाचा ट्रेलर लॉँच झाला, त्यात सना कपूरची महत्त्वपूर्ण भूमिका असून स्वभावानुसार भूमिका मिळाल्याचा आनंद तिने सीएनएक्सशी बोलताना व्यक्त केला. सना कपूर ही दिग्दर्शक पंकज कपूर आणि सुप्रिया पाठक यांची मुलगी तसेच अभिनेता शाहीद कपूरची लहान बहिण असून या चित्रपटात ती नैनताराची भूमिका साकारत आहे. चित्रपटात ती एका लहान गावातून मुंबई सारख्या मोठ्या शहरात जाते. सुरुवातील अगदी साधी सरळ स्वभावाची नैनतारा नंतर अत्यंत चुलबूली आणि हटके दाखविण्यात आली आहे. या चित्रपटाची स्क्रीप्ट आणि कॅरेक्टर्स खूपच कॉमेडीयन असल्याचेही ती म्हणाली. ही थीम म्हणजे डबल मिनिंग कॉमेडी नसून संपूर्ण पारिवारीक आहे, असेही ती म्हणाली.

विशेष म्हणजे चित्रपटातील प्रत्येक कॅरेक्टर्समधून तिला बरेच शिकायला मिळाले, हे तिने आवर्जून सांगितले. अभिनय करताना प्रत्येकाचा मेंदू किती वेगाने काम करतो, ही बाब तर मी याच चित्रपटात काम करताना अनुभवली, असेही ती म्हणाली. शूटिंग करताना खूपच मौजमजादेखील आली आणि सर्वांसोबतचा अनुभवदेखील आगळावेगळा होता, असेही तिने सांगितले. 

आगामी काळात अजून एका कॉमेडी चित्रपटात काम करणार असल्याचे सना म्हटली. तो चित्रपट कॉमेडी तर असेलच शिवाय त्यात ड्रामा आणि रोमान्सदेखील असेल. सनाला प्रत्येक प्रकारचा अभिनय करायला आवडतो. मजेदार, फनी चित्रपटांना तर तिच्या आयुष्यात वेगळे स्थान असल्याचे ती म्हटली. 

ज्या प्रकारे शाहिद कपूरने मीरा राजपूतशी गुपचूप लग्न केले होते, त्याच प्रकारे सनानेही गुपचूप लग्न केले होते. सना या अगोदर ‘शानदार’ चित्रपटातही दिसली होती. त्यात तिने तिच्या भूमिके मुळे सर्वांची मन जिंकली होती. आलिया भट मुख्य भूमिकेत होती तर सनाने आलियाच्या मोठ्या बहिणीची भूमिका साकारली होती. शाहिद कपूर, इशान खट्टर आणि रुहान खट्टर हे सनाच्या सावत्र आईचे मुले आहेत.  
Web Title: Sana says, enjoying the roles as a result of joy!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.