सुपरस्टार सलमान खानची अभिनेत्री आयशा टाकिया कित्येक महिन्यांनंतर कॅमेºयासमोर आली आहे. मुंबईतील गोरेगावच्या एका स्टुडिओमध्ये आयशा जाहिरातीची शूटिंग करीत आहे. त्याचवेळी तिच्या काही अदा कॅमेºयात टिपण्यात आल्या. आयशाने स्वत:च याबाबतचा खुलासा केला की, या ठिकाणी ती जाहिरातीचे शूटिंग करीत आहे. त्याचबरोबर लवकरच चित्रपटात येण्याची इच्छा असल्याचेही तिने बोलून दाखविले आहे. लग्नानंतर आयशा लाइमलाइटपासून दूर गेली होती. याविषयी आयशाने सांगितले होते की, घरगुती जबाबदारी स्वीकारण्यासाठीच मी काही दिवस चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. मात्र आता मी चित्रपटांमध्ये कमबॅक करीत आहे. त्यासाठी स्क्रिप्ट्स वाचत असल्याचेही तिने सांगितले. सध्या आयशा तिच्या फिटनेसवर अधिक लक्ष देऊन आहे. ती तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तिचे फॅशनेबल फोटो अपलोड करीत असते. आपल्या फॅशन स्टाइलमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आयशा टाकियाने २००४ मध्ये ‘टार्जन द वंडर कार’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटासाठी तिला फिल्म फेअरचा बेस्ट डेब्यू फिमेल अवॉर्डही मिळाला होता. २००६ मध्ये तिचा ‘डोर’ हा चित्रपट प्रसिद्ध झाला होता. ज्यामध्ये तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा अवॉर्ड मिळाला होता. पुढे सलमान खानसोबत ती ‘वॉन्टेड’ चित्रपटात झळकली. मात्र या चित्रपटाचा तिला फारसा फायदा झाला नाही. या व्यतिरिक्त  तिने ‘दिल मांगे मोर, शादी नंबर-१, शादी से पहले, कॅश, पाठशाला, दे ताली’ यांसारख्या चित्रपटांमध्येही काम केले आहे. २००० या वर्षापासून ते आतापर्यंत आयशाच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. समोर आलेल्या बातम्यांनुसार, आयशाने लिप्स, जॉ लाइन, आयब्रो आणि फोरहेड सर्जरी केली आहे. तिचा नवा लूक समोर आल्यानंतर सोशल मीडियावर ती चांगलीच चर्चेत आली होती. या लूकवरून तिला ट्रोलही केले होते. आयशा टाकियाने समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीसोबत २०१४ मध्ये लग्न केले होते. 
Web Title: Salman Khan's 'Wanted' actress appeared in front of camera after several months!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.