Salman Khan's 'secret' was revealed after 60 years by Salman Khan! | ​सलमान खानचे पापा सलीम खान यांनी ६० वर्षांनंतर उघड केले एक ‘रहस्य’!

सलमान खानबद्दल आपल्या सर्वांनाच अनेक गोष्टी माहित आहेत. पण सलमानचे पापा सलीम खान यांच्याबद्दलची एक गोष्ट मात्र क्वचितच तुम्हाला ठाऊक असावी. होय, कारण ८२ वर्षांचे बॉलिवूडचे नामवंत पटकथालेखक सलीम खान यांनी स्वत: ६० वर्षांनंतर एक ‘रहस्य’ उघड केले आहे. ‘रहस्य’ यासाठी कारण खान कुटुंबातील अनेक सदस्यही आत्तापर्यंत या गोष्टीपासून अनभिज्ञ होते. खुद्द सलमानलाही ही गोष्ट माहित नव्हती. आता तुम्हालाही हे ‘रहस्य’ जाणून घ्यायची उत्सुकता लागली असेल. हे ‘रहस्य’ म्हणजे,  सलीम खान एक प्रशिक्षित वैमानिक आहेत. होय, तरूणवयात इंदूरमध्ये सलीम खान यांनी अनेकदा उड्डाण भरले आहे. सिव्हील एविएशनचे माजी संचालक जनरल डॉक्टर यशराज टोंगिआ अलीकडे सलीम खान यांना भेटायला गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये आलेत. यावेळी यशराज व सलीम यांनी आपल्या काही जुन्या आठवणी जाग्या केल्यात. याचदरम्यान सलीम खान यांच्याकडे  विमान उडवण्याचा परवाना आहे, ही गोष्ट समोर आली. यशराज यांनी यादरम्यानचा एक किस्साही शेअर केला. ALSO READ : ​सलमान खानला आठवला तुरुंगातील तो भावूक क्षण!

 १९५८ मध्ये सलीम खान टायगर मॉथ चालवत होते. याचदरम्यान विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड झाला. धोक्याचा अलार्म वाजला. इंजिन फेल झाल्याचे सलीम खान यांच्या लक्षात आले. पण अतिशय धैर्याने आणि शांततापूर्वक विमान माघारी घेण्याचा निर्णय घेत, सलीम यांनी विमान सुरक्षित फोर्स लँड केले, हाच तो किस्सा. १९५८ मध्ये सलीम केवळ २२ वर्षांचे होते आणि इतक्या लहान वयात पूर्ण रूपाने एक कमिशन्ड पायलट होते.

सलीम यांनी आजही आपल्या विमान उडवण्याचा परवाना सांभाळून ठेवला आहे. ‘जंजीर’ या चित्रपटाचा ओरिजनल स्क्रीनप्लेही सलीम यांनी अगदी तसाच जपून ठेवला आहे. या चित्रपटाची कथा सलीम खान आणि जावेद अख्तर यांनी लिहिली होती.जावेद अख्तरसोबत मिळून सलीम अली यांनी बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. यात ‘जंजीर’,‘दीवार’,‘त्रिशूल’,‘काला पत्थर’,‘मिस्टर इंडिया’ अशा अनेक चित्रपटांचा समावेश आहे. या चित्रपटांची स्क्रिप्ट अर्थात पटकथा सलीम व जावेद यांनी लिहिलीयं.  अलीकडे सलीम खान फार पटकथा लिहित नाहीत. याऊलट त्यांचा मुलगा सलमान आहे. सलमानच्या चित्रपटाची रांग संपता संपत नाही.
Web Title: Salman Khan's 'secret' was revealed after 60 years by Salman Khan!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.