Salman Khan's role in 'India' will be played in Patani | सलमान खानच्या 'भारत'मध्ये दिशा पटानी साकारणार 'ही' भूमिका

अभिनेता सलमान खानच्या आगामी चित्रपट 'भारत'मध्ये देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि दिशा पटानी दिसणार आहे. अली अब्बास दिग्दर्शित चित्रपटात दिशाचे नाव काही दिवसांपूर्वीच फायनल करण्यात आले आहे. मात्र ती नक्की कोणत्या भूमिकेत दिसणार हे अद्याप स्पष्ट झालेले नव्हते. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार यात दिशा सलमानच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. एक इंटरव्हुमध्ये दिशा म्हणाली होती की, ''मी भारतचा हिस्सा आहे, ही गोष्ट माझ्यासाठी खूपच भाग्याची आहे. मला वाटते हे देवाच्या, माझ्या आई-वडिलांच्या आणि चाहत्यांच्या शुभेच्छांमुळे मला हा चित्रपट करायला मिळतो आहे.  

काही महिन्यांपूर्वी दिशा आणि टायगरच्या जोडीच्या 'बागी2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावला होता. बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी दिशाला ‘लोफर’ हा तेलगू सिनेमा मिळाला. यानंतर एका म्युझिक व्हिडिओत ती दिसली आणि यानंतर ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट तिला मिळाली. ‘एम एस धोनी : दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात दिशाने धोनीच्या पहिल्या प्रेयसीची भूमिका साकारली होती. 

 भारत चित्रपटाबाबत बोलायचे झाले तर यात सलमान खान 5 वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. चित्रपटात सलमान 60 वर्षांचे आयुष्य जगताना दाखवण्यात येणार आहे. 52 वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये 18 वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे. म्हणजेच, ‘मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली. याच टीमने ‘फॅन’ या चित्रपटात शाहरूखसाठी काम केले होते. सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे.  

ALSO READ :  दिशा पाटनीच्या बिकिनी फोटोवर टायगर श्रॉफच्या मम्मीने दिली ‘ही’ प्रतिक्रिया!
 
Web Title: Salman Khan's role in 'India' will be played in Patani
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.