सलमान खानचा ‘रेस3’ने बॉक्सआॅफिसवर धम्माल केली. चार दिवसांत या चित्रपटाने २०० कोटींचा पल्ला गाठला. पण सोशल मीडियावर मात्र अद्यापही या चित्रपटावरून सुरू झालेला विनोदांचा ओघ अद्याप आटलेला नाही. सलमानच्या ‘रेस3’ या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरदार खिल्ली उडवली जातेय. ‘रेस3’मधील गाणे, संवाद, एवढेच नव्हे तर यातील अ‍ॅक्शन सीन्सवरूनही सलमानची मजा घेतली  जातेय. काही चाहत्यांनी तर ‘रेस3’चे नाव बदलून ‘फेक3’ही ठेवलेय. सलमानच्या या चित्रपटाबद्दल कधी नव्हे इतके जोक्स व्हायरल होत आहेत. यापूर्वी सलमानच्या कुठल्याच चित्रपटाची इतकी खिल्ली उडवली गेली नाही.भाईजानच्या चाहत्यांच्या या चित्रपटावर उड्या पडताहेत तर अनेकजण हा चित्रपट पाहिल्यानंतर ‘धक्क्यात’ आहेत. या ‘धक्क्यात’ असलेल्या युजर्सनी  ‘रेस3’वरून एका पेक्षा एक विनोद केले आहेत. हे विनोद वाचल्यानंतर तुम्ही पोट धरून धरून हसल्याशिवाय राहणार नाहीत़ एका युजरने लिहिले लिहिलेयं,
 अनुष्का : तू रस्त्यावर कचरा का फेकते आहेस़ 
सलमान चाहते :, ते ‘रेस3’चे तिकिट  आहेएका युजरने लिहिलेय की, ‘कायदे से रेस 3 उस जज को 500 बार दिखानी चाहिए जिसने सल्लू भाई को बेल ग्रांट की थी’.अन्य एकाने लिहिलेय, ‘ भाई इससे अच्छा था कि आप जेल में ही रहते कम से कम रेस 3 जैसी फिल्म देखने को न मिलती.’काहींनी याअनुषंगाने काही मजेदार व्हिडिओही पोस्ट केले आहेत. अनेक मीम्स सोशल मीडियावर आहेत.  

ALSO READ :भाईजानच्या चाहत्यांसाठी खूशखबर ! सलमान खानचा ‘रेस4’ही येणार !!

 चित्रपट समीक्षकांनी  ‘रेस3’ या चित्रपटाला फारशी दाद दिली नाही. पण तरिही हा चित्रपट बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. केवळ देशातचं नाही तर विदेशातही या चित्रपटाची जादू पाहायला मिळतेय. वर्ल्ड वाईड कलेक्शनच्या आकड्यांवर नजर टाकली तर आत्तापर्यंत चित्रपटाने 200 कोटींचा आकडा पार केला आहे. केवळ चारचं दिवसांत ‘रेस3’ने 210.88 कोटी रूपयांचा गल्ला जमवला आहे.
 

Web Title: Salman Khan's 'Race 3': Money on box office and humorous rain on social media!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.