Salman Khan's 'Race-3' has already earned 130 crores, Aamir Khan has recorded a break! | सलमान खानच्या ‘रेस-३’ने प्रदर्शनाअगोदरच कमविले १३० कोटी, आमीर खानचे रेकॉर्ड केले ब्रेक !

सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. ईदच्या निमित्ताने म्हणजेच दि. १५ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार असून, चाहते त्याची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे. त्याचबरोबर चित्रपटाच्या व्यवसायाबाबतही आता तर्कवितर्क लावले जात आहेत. वास्तविक सलमानच्या चित्रपटाला दोनशे ते तीनशे कोटी रुपयांचा व्यवसाय करणे आता कॉमन बाब झाली आहे; परंतु हे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, प्रदर्शनाअगोदरच सलमानच्या ‘रेस-३’ने १३० कोटी रुपयांची कमाई केली आहे. 

सलमान खान आणि रमेश तौरानीच्या या चित्रपटाच्या निर्मितीसाठी शंभर कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला आहे; परंतु प्रदर्शनाअगोदरच चित्रपटाने निर्मितीच्या खर्चापेक्षाही अधिक कमाई केली आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे सॅटेलाइट्स अधिकार १३० कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले आहेत. अशात चित्रपटाने प्रदर्शनाअगोदरच ३० कोटींचा नफा मिळविला आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत एकाही बॉलिवूड चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार मोठ्या किमतीत विकले गेले नाहीत. अशात हे रेकॉर्डच म्हणावे लागेल. या अगोदर बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या ‘दंगल’चे सॅटेलाइट अधिकार ११० कोटी रुपयांमध्ये विकण्यात आले होते. ‘रेस-३’ अ‍ॅक्शन आणि थ्रिलरने भरपूर आहे. ‘रेस’ फ्रेंचाइजीचा हा तिसरा चित्रपट आहे. चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त जॅकलीन फर्नांडिस, अनिल कपूर, बॉबी देओल, जेडी शाह आणि साकिब सलीम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाने केले आहे. 
Web Title: Salman Khan's 'Race-3' has already earned 130 crores, Aamir Khan has recorded a break!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.