सुपरस्टार सलमान खानची सख्खी भाची एलिजा अग्निहोत्री लवकरच बॉलिवूडमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे. एलिजाने सोशल मीडियावर स्वत:ला अ‍ॅक्टर-डायरेक्टर असे संबोधले आहे. ती इंटरनेटवर जबरदस्त अ‍ॅक्टिव असते. ती तिच्या परिवार आणि मित्रांसोबतचे बरेचसे फोटो शेअर करीत असते. फोटो शेअर करताना ती लोकांना तो फोटो अधिकाधिक शेअर करण्याची विनंतीही करीत असते. यावरून याबाबतचा अंदाज लावला जाऊ शकतो की, एलिजाला लवकरात लवकर सेलिब्रिटी बनण्याची इच्छा आहे. एलिजा मामा सलमान खानच्या चित्रपटांच्या प्रमोशन पार्ट्यांमध्येही बºयाचदा बघावयास मिळाली आहे. ती आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटच्या माध्यमातून लोकांना मामा सलमानचे चित्रपट बघण्यासाठी अपील करीत असते. एलिजा अग्निहोत्री सलमानची मोठी बहीण अलवीरा आणि मेहुणा अतुल अग्निहोत्री यांची मुलगी आहे. सध्या मुंबईमध्ये उच्चशिक्षण घेत आहे. एलिजा सातत्याने फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ग्लॅमरस फोटोज शेअर करीत असते. सलमानने आतापर्यंत अनेकांना बॉलिवूडमध्ये लॉन्च केले आहे. त्याने कितीतरी नातेवाइकांना आणि मित्रांना बॉलिवूडमध्ये संधी मिळवून दिली आहे. अशात सलमानच आपल्या भाचीला बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू शकतो. सध्या तो बहीण अर्पिताचा पती आयुषला ‘लवरात्रि’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी धडपड करीत आहे. अशात एलिजालाही तो ती संधी देऊ शकतो. दरम्यान, एलिजाकडे करिअरचा दुसराही मार्ग आहे. तिचे वडील अतुल अग्निहोत्री स्वत: बॉलिवूडमधील चांगल्या निर्मात्यांपैकी एक आहेत. अशात स्वत: अतुल आपल्या मुलीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करू शकतो. दरम्यान, गेल्या काही काळापासून बºयाचशा स्टार्सच्या मुली बॉलिवूडमध्ये येण्याची तयारी करीत आहेत. त्यामध्ये श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ‘धडक’मधून डेब्यू करणार आहे. तर चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे ‘स्टुडंट आॅफ द इयर-२’मधून बॉलिवूडमध्ये एंट्री करणार आहे. त्याचबरोबर सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी सारा अली खान हीदेखील लवकरच ‘केदारनाथ’मधून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणार आहे. 

बॉलिवूडचा किंग शाहरूख खानची मुलगी सुहाना खान हीदेखील सध्या बॉलिवूडमध्ये येण्यासाठी धडपड करीत आहे. अशात सुहानाला लॉन्च करण्यासाठी किंग खान लवकरच तयारी करण्याची शक्यता आहे. दरम्यान, सलमानच्या भाचीविषयी सांगायचे झाल्यास, ती सुंदरतेत या सर्वांच्या तुलनेत कुठेच कमी नाही. त्यामुळे आगामी काळात स्टारडॉटर्सची जबरदस्त टक्कर बघावयास मिळू शकते. 
Web Title: Salman Khan's niece; Entry can soon be done in Bollywood; See photo!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.