Salman Khan's muscular body, the woman said, 'I love you Tiger'! | सलमान खानची मस्क्युलर बॉडी बघून तरुणीने म्हटले, ‘आय लव्ह यू टायगर’!

बॉलिवूडचा दबंग सलमान खानला त्याच्या प्रत्येक चित्रपटात शंभर टक्के परफॉर्मन्स देण्यासाठी ओळखले जाते. असाच परफॉर्मन्स त्याने त्याच्या आगामी ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात दिला आहे. त्याने त्याच्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यासाठी त्याने शूटिंगदरम्यान तब्बल तीन महिने जिममध्ये घाम गाळला आहे. याचा पुरावा म्हणून सलमानचा एक शर्टलेस फोटो नुकताच सोशल अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, सलमानची मस्क्युलर बॉडी बघण्यासारखी आहे. सलमानचा हा किलर लूक सध्या सोशल मीडियावर कहर करीत असून, तरुणींना त्याचा हा अंदाज प्रचंड भावत आहे. 

सूत्रानुसार, सलमानने शूटिंग सुरू करण्याच्या तीन महिने अगोदरच जिममध्ये वर्कआउट करण्यास सुरुवात केली होती. त्यामुळे या अगोदर कधीही बघितला नसेल अशा अवतारात सलमान दिसत आहे. दरम्यान, दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी एका वृत्तपत्राशी बोलताना म्हटले की, सलमानने आॅस्ट्रिया येथे शूटिंग सुरू करण्याच्या तीन महिने अगोदरच वर्कआउट करण्यास सुरुवात केली होती. जेणेकरून चित्रपटाला आवश्यक असलेली फिटनेस लेव्हल त्याला मेण्टेन करता येईल. जिमिंगच नव्हे तर सलमानने आॅस्ट्रियाच्या बर्फाच्छादित डोंगराळ भागात शूटिंग करण्यासाठी एल्टीट्यूट ट्रेनिंगही घेतले. हे ट्रेनिंग त्याच्याकरिता खूपच चॅलेंजिंग होते, असेही अली अब्बास जफर यांनी सांगितले. 

दरम्यान, चित्रपटाच्या ट्रेनिंगबद्दलच सांगायचे झाल्यास सलमानने अतिशय थंड हवामानातही सायकलिंग करण्याचेही धाडस केले. त्याचबरोबर फिटनेस मेटेंन ठेवण्यासाठी डाइटही फॉलो केला. शूटिंगदरम्यान सलमानने केवळ हाय प्रोटिन डायट घेतला. असो, सलमान या चित्रपटात अतिशय दमदार भूमिकेत बघावयास मिळणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री कॅटरिना कैफचाही अंदाज बघण्यासारखा असेल. ‘एक था टायगर’चा सीक्वेल असलेल्या या चित्रपटात तुफान अ‍ॅक्शन बघावयास मिळणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाचा ट्रेलर आणि दोन गाणी रिलीज करण्यात आली आहेत. त्यास प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. 
Web Title: Salman Khan's muscular body, the woman said, 'I love you Tiger'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.