Salman Khan's muddled look at the same car in the parking lot; Then something happened? | पार्किंगमधील एकसारख्या कार बघून सलमान खानचा झाला गोंधळ; मग काहीसे असे घडले?

सुपरस्टार सलमान खान सध्या त्याच्या आगामी ‘रेस-३’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चित्रपटात सलमान खान जबरदस्त अ‍ॅक्शन भूमिकेत बघावयास मिळणार आहे. ‘रेस-३’ हा चित्रपट रेमो डिसूजा दिग्दर्शित करीत असून, या चित्रपटात सलमान व्यतिरिक्त बॉबी देओल, जॅकलीन फर्नांडिस, साकिब सलीम आणि डेजी शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. असो, सलमान खानशी संबंधित एक मजेशीर व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान खानसोबत असे काही झाले की, तो काही क्षण गोंधळात पडला. वास्तविक असे आपल्यासोबतही नेहमीच होत असते. जेव्हा पार्किंगमध्ये आपल्या कारसारख्याच रंगाच्या इतर कार पार्क केलेल्या असतात, तेव्हा त्यातील आपली कार नेमकी कोणती असा गोंधळ होत असतो. या व्हिडीओमध्ये सलमान आपल्या संपूर्ण टीमसोबत दिसत आहे. त्याचवेळी हा मजेशीर किस्सा घडला. 

या व्हिडीओमध्ये सलमान आपल्या संपूर्ण टीमसोबत पार्किंगमध्ये येतो. चालत असताना तो अचानकच थांबतो. कारण त्याच्या कारप्रमाणे बºयाचशा कार त्याठिकाणी पार्क केलेल्या होत्या. त्यामुळे सलमान एक सेकंदासाठी उभा राहतो आणि विचार करतो की, नेमकी आपली कार कोणती? त्यानंतर अचानकच त्याची नजर एका कारवर पडते व तो त्यादिशेने जायला लागतो. सध्या सलमानचा हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, त्याच्यासोबत घडलेला हा मजेशीर किस्सा चांगलाच पसंत केला जात आहे. 
 

सलमान आणि बॉबी देओलचा ‘रेस-३’ हा चित्रपट १५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाविषयी सध्या प्रचंड उत्सुकता असून, यामध्ये तुफान अ‍ॅक्शन सीन्स बघावयास मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर पुन्हा एकदा सलमान-जॅकलीन आणि डेजी शाहचा रोमान्स बघावयास मिळणार आहे. दरम्यान, चित्रपटाला रमेश तोरानी यांनी प्रोड्यूस केले असून, रेमो डिसूजाने कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक म्हणून आपली भूमिका बजावली आहे. 
Web Title: Salman Khan's muddled look at the same car in the parking lot; Then something happened?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.