Salman Khan's love in the film Ratan Dhan Payo, Sonam Kapoor, the actress would appear in the main role | ​सलमान खानच्या प्रेम रतन धन पायो या चित्रपटात सोनम कपूर नव्हे तर ही अभिनेत्री दिसणार होती मुख्य भूमिकेत

प्रेम रतन धन पायो हा सलमान खानचा चित्रपट चांगलाच गाजला होता. सलमानच्या आजवरच्या हिट चित्रपटांपैकी एक हा चित्रपट मानला जातो. या चित्रपटात प्रेक्षकांना सोनम कपूर आणि सलमान खानची जोडी पाहायला मिळाली होती. त्या दोघांच्या केमिस्ट्रीची चांगलीच चर्चा या चित्रपटामुळे झाली होती. पण या चित्रपटात सोनमच्या आधी एका वेगळ्याच अभिनेत्रीचा विचार करण्यात आला होता. सलमान खानने या चित्रपटात डबल रोल साकारला होता. या चित्रपटातील सलमानच्या अभिनयाचे कौतुक सगळ्यांनी केले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमाई देखील चांगली केली होती. या चित्रपटात सलमान आणि सोनमसोबतच नील नितीन मुकेश, अनुपम खेर, स्वरा भास्कर, अरमान कोहली यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
सलमानने प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या निमित्ताने राजश्री प्रोडक्शनसोबत अनेक वर्षांनी काम केले होते. त्यामुळे या चित्रपटात कोणतीही कमतरता येऊ नये यासाठी संपूर्ण प्रोडक्शन हाऊस प्रयत्न करत होते. सलमान आणि दीपिका पादुकोण हे बॉलिवूडमधील दोन्ही मोठे स्टार असले तरी त्यांनी कधीच एकमेकांसोबत काम केले नाही. त्यामुळे प्रेम रतन धन पायो या चित्रपटाच्या निमित्ताने दीपिका आणि सलमानची जोडी प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार होती. या चित्रपटासाठी दीपिकाला विचारण्यात देखील आले होते. पण काही कारणांमुळे तिने या चित्रपटाला नकार दिला आणि या चित्रपटात सोनम कपूरची वर्णी लागली. पण सोनमने या चित्रपटात खूप चांगला अभिनय करून तिला या चित्रपटात घेऊन निर्मात्यांनी योग्यच केले हे सिद्ध करून दाखवले.
राजश्री प्रोडक्शन या बॅनरखाली सलमान खानने अनेक चित्रपट साकारले आणि सगळेच चित्रपट हिट झाले. त्यामुळे राजश्री बॅनर त्याच्यासोबत काम करण्याची एकही संधी सोडत नाही. राजश्री प्रोडक्शनचा 'प्रेम रतन धन पायो' हा चित्रपट देखील ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या यादीत समाविष्ट झाला होता. सलमानने याआधी राजश्रीसोबत मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है असे हिट चित्रपट दिले आहेत. राजश्रीच्याच मैंने प्यार किया या चित्रपटामुळे सलमानला खरी लोकप्रियता मिळाली. 

prem ratan dhan payo deepika padukone

Also Read : ​#HappyBirthdaySonamKapoor: तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल पण सोनम कपूरने हॉटेलमध्ये केले आहे वेटरचे काम
Web Title: Salman Khan's love in the film Ratan Dhan Payo, Sonam Kapoor, the actress would appear in the main role
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.