Salman Khan's girlfriends did 'o' work in 'Veerre The Wedding'; Selection of four hundred girls! | ‘वीरे दी वेडिंग’मध्ये सलमान खानच्या गर्लफ्रेंडनेही केले ‘हे’ काम; चारशे तरुणींमधून झाली निवड!

बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानची तथाकथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरने अधिकृतरीत्या बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आहे. ‘रेस-३’मध्ये भाईजानने लिहिलेले गाणे गायल्यानंतर आता ती अभिनेत्री करिना कपूर-खान आणि सोनम कपूरच्या ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाचा भाग बनणार आहे. ‘वीरे दी वेडिंग’च्या टायटल ट्रॅकमध्ये करिना कपूर, सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया बॅँकॉकच्या सुंदर निसर्गरम्य वातावरणात एका पार्टी नंबरवर डान्स करताना बघावयास मिळणार आहेत. हे गाणे सात गायकांनी मिळून गायले आहे. या महिला गायकांमध्ये यूलिया वंतूरचाही समावेश आहे. 

वास्तविक ‘वीरे दी वेडिंग’च्या टायटल ट्रॅकसाठी जवळपास ४०० फिमेल आर्टिस्ट्सचे आॅडिशन घेण्यात आले होते. त्यातील ५० आर्टिस्टची शॉर्टलिस्ट करण्यात आली. त्यानंतर अंतिम सहाची निवड करण्यात आली. त्यामध्ये यूलियाच्या नावाचा समावेश होता. आदिती सिंग-शर्मा, निकिता आहुजा, श्रवी यादव, पायल देव, यूलिया वंतूर आणि विशाल मिश्रा यांनी मिळून हे गाणं गायले आहे. ‘वीरे दी वेडिंग’चे टायटल ट्रॅक अनविता दत्त गुप्तनने लिहिले आहे. लवकरच हे गाणे प्रदर्शित केले जाणार आहे. चित्रपटातील ‘तारिफां आणि भंगडा दा सजदा’ हे दोन गाणे या अगोदरच प्रदर्शित करण्यात आले आहे. दोन्ही गाणे प्रेक्षकांच्या चांगलेच पसंतीस येत आहेत. शशांक घोष यांनी दिग्दर्शित केलेला ‘वीरे दी वेडिंग’ हा चित्रपट चार मैत्रिणींची कथा आहे. ज्या आपल्या अटी आणि शर्तींवर जगत असतात. चित्रपटाला एकता कपूर, रिया कपूर आणि निखिल द्विवेदी यांनी मिळून प्रोड्यूस केले आहे. 
Web Title: Salman Khan's girlfriends did 'o' work in 'Veerre The Wedding'; Selection of four hundred girls!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.