या दिवशी प्रदर्शित होणार सलमान खानचा दबंग 3

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2019 04:25 PM2019-04-27T16:25:07+5:302019-04-27T16:26:28+5:30

दबंग 3 या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले ही बातमी मीडियात आल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.

Salman Khan's dabang 3 will be released onDecember 20 | या दिवशी प्रदर्शित होणार सलमान खानचा दबंग 3

या दिवशी प्रदर्शित होणार सलमान खानचा दबंग 3

googlenewsNext
ठळक मुद्दे सलमानने दबंग चित्रपटातील त्याचा फोटो पोस्ट करून 20 डिसेंबर 2019 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. या फोटोत त्याने पोलिसांची वर्दी घातली असून त्यावर चुलबुल पांडे असे लिहिलेले आहे. 

बॉलिवूडचा दबंग खान सलमान सध्या 'दबंग ३' या चित्रपटाचे शूटिंग करण्यात व्यग्र आहे. त्याचे मध्य प्रदेशमधील चित्रीकरण काही दिवसांपूर्वी संपले असून ही माहिती खुद्द त्यानेच सोशल मीडियावरून दिली होती आणि तिथल्या सेटवरील फोटोदेखील शेअर केला होता. सलमानने मध्यप्रदेशमधील महेश्वर येथे १२ दिवस दबंग ३चे चित्रीकरण केले. या चित्रीकरणावरून वादही निर्माण झाला होता. पण तरीही सलमान खानने महेश्वरमधील 'दबंग ३'चे चित्रीकरण पूर्ण केले. 


दबंग 3 या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाले ही बातमी मीडियात आल्यापासून हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार याची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. दबंग 3 कधी प्रदर्शित होणार याविषयी स्वतः सलमान खानने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सांगितले आहे. सलमानने दबंग चित्रपटातील त्याचा फोटो पोस्ट करून 20 डिसेंबर 2019 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सगळ्यांना सांगितले आहे. या फोटोत त्याने पोलिसांची वर्दी घातली असून त्यावर चुलबुल पांडे असे लिहिलेले आहे. 

काही दिवसांपूर्वी सलमान खानने दबंग चित्रपटातील 'हुड हुड दबंग...' हे शीर्षक गीत शूट केले. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासूनच हा चित्रपट चांगलाच वादात अडकला आहे. सुरुवातीला हा चित्रपट शिवलिंगामुळे वादात अडकला होता. 'दबंग३'च्या सेटवरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोत एक शिवलिंग लाकडाच्या चौकटीने झाकलेले दिसून येत होते.

हा फोटो व्हायरल होताच लोकांनी सेटवर गोंधळ घातला होता. केवळ इतकेच नाही तर सोशल मीडियावर यावर नाराजीचा सूर उमटला होता. त्यासाठी सलमानला माफी मागावी लागली होती. इतकेच नाही तर भारतीय पुरातत्व विभागाने 'दबंग ३'च्या प्रोडक्शन टीमला नोटीस पाठवली होती आणि त्यात नर्मदा नदीजवळच्या किल्ल्यातील प्राचीन मूर्तींना नुकसान पोहोचवल्याचा आरोप करण्यात आला होता. 

'दबंग ३'चे दिग्दर्शन प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक प्रभू देवा करत आहे. या चित्रपटात पुन्हा एकदा सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा ही जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 'दबंग' फ्रेंचाइजीचा तिसरा चित्रपट आहे. 

Web Title: Salman Khan's dabang 3 will be released onDecember 20

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.