भाईजान सलमान खानची वाढली डोकेदुखी! ‘X-Men Dark Phoenix’शी होणार सामना!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 01:53 PM2019-05-15T13:53:43+5:302019-05-15T13:53:48+5:30

होय, ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणा-या ‘भारत’समोर ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’ या हॉलिवूडपटाचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.

salman khans bharat to meet with a big clash at the box office as hollywood film x-men dark phoenix reaching on eid 2019 | भाईजान सलमान खानची वाढली डोकेदुखी! ‘X-Men Dark Phoenix’शी होणार सामना!!

भाईजान सलमान खानची वाढली डोकेदुखी! ‘X-Men Dark Phoenix’शी होणार सामना!!

googlenewsNext
ठळक मुद्दे ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’ हा हॉलिवूडपट  सुपरपॉवर्स व शास्त्रज्ञांच्या संघर्षाची कथा आहे. तर ‘भारत’ हा चित्रपट एका व्यक्तिच्या आयुष्याची कथा मांडणारा सिनेमा आहे.

सलमान खानचा ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. तूर्तास सोशल मीडियावर या चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर, टीजर आणि गाण्यांनी धुमाकूळ घातलाय. पण याचदरम्यान  ‘भारत’च्या प्रदर्शनादरम्यान एक मोठी अडचण समोर येऊन उभी ठाकलीय. होय, ईदच्या मुहूर्तावर रिलीज होणाºया ‘भारत’समोर ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’ या हॉलिवूडपटाचे कडवे आव्हान उभे ठाकले आहे.
 ‘भारत’ आणि  ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’ हे दोन्ही चित्रपट एकाच दिवशी म्हणजे येत्या ५ जूनला बॉक्सआॅफिसवर धडकणार आहेत. अशात कमाईच्या बाबतीत सुरुवातीचे तीन दिवस ‘भारत’साठी महत्त्वपूर्ण असणार आहेत. भाईजानच्या चित्रपटाने प्रदर्शनासोबत बॉक्सआॅफिसवर कब्जा मिळवला तर बरे. पण यदाकदाचित या चित्रपटाचीही ‘रेस 3’ आणि ‘ठग्स आॅफ हिंदोस्तान’सारखी स्थिती झाली तर  ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’पुढे भाईजानच्या चित्रपटाचा टीकाव लागणे कठीण मानले जात आहे.

अलीकडे देशात हॉलिवूड चित्रपटांची क्रेज पाहायला मिळतेय. ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ची क्रेज तर अद्यापही कायम आहे. आत्तापर्यंत या चित्रपटात ३५० कोटींचा बिझनेस केला. अशात ‘भारत’ विरूद्ध ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’चा सामना कसा रंगतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 


 ‘एक्समॅन- डार्क फिनिक्स’ हा हॉलिवूडपट  सुपरपॉवर्स व शास्त्रज्ञांच्या संघर्षाची कथा आहे. तर ‘भारत’ हा चित्रपट एका व्यक्तिच्या आयुष्याची कथा मांडणारा सिनेमा आहे. ‘भारत’बद्दल सांगायचे झाल्यास देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आत्तापर्यंतची कथा सलमानच्या या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. भारताच्या पूर्वजांनी कुठल्या प्रकारच्या स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले होते आणि आजचा भारत कसा आहे,अशी या चित्रपटाची ढोबळ कथा आहे. या चित्रपटात भाईजान सलमान खानसोबत कतरीना कैफ, जॅकी श्रॉफ, नोरा फतेही, सुनील ग्रोव्हर, तब्बू, दिशा पाटनी असे अनेक कलाकार आहेत. हा सिनेमा हिंदीशिवाय, तमिळ, तेलगू आणि मल्याळम भाषेत रिलीज होणार आहे. मेकर्सना हा सिनेमा लिमिटेड आॅडियन्सपर्यंत मर्यादित ठेवायचा नसल्यामुळे भारताला अन्य भाषांमध्ये सुद्धा रिलीज करण्यात येणार आहे.

Web Title: salman khans bharat to meet with a big clash at the box office as hollywood film x-men dark phoenix reaching on eid 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.