Salman Khan's actress has fallen in love with this dialogue; Trailers took the spin! | या डायलॉगमुळे सलमान खानच्या अभिनेत्रीची झाली फजिती; ट्रोलर्सनी घेतली अशी फिरकी!

सुपरस्टार सलमान खानचा आगामी ‘रेस-३’ हा चित्रपट बºयाच कारणांनी चर्चेत आहे. तुफान अ‍ॅक्शन असलेल्या रेमो डिसूझाच्या या चित्रपटाचा ट्रेलर सहा दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यास आतापर्यंत २७ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच चित्रपटातील ‘हीरिए...’ हे गाणे तर यू-ट्यूबवर ट्रेंड करीत आहे. त्याचबरोबर सोशल मीडियावरही सर्वत्र ‘रेस-३’चीच चर्चा रंगत आहे. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे ही चर्चा सुपरस्टार सलमान खान किंवा जॅकलिन फर्नांडिसवर नसून, अभिनेत्री डेजी शाहवरच जास्त रंगताना दिसत आहे. 
 }}}} ">Paresh Rawal Rocked, Daisy Shah Shocked!#Race3MostViewedTrailerIn24Hrs#Race3Trailerpic.twitter.com/Nlh8ukBURi

— The Timeliners (@the_timeliners) May 18, 2018
ट्रेलरमधील ‘आर बिझनेस इज आर बिझनेस, नन आॅफ योर बिझनेस’ हा डेजी शाहचा डायलॉग चांगलाच हिट होताना दिसत आहे. मात्र या डायलॉगवरून यूजर्स डेजीची चांगलीच खिल्ली उडवित आहेत. कारण हा डायलॉग डेजीनेच अतिशय नाटकीय अंदाजात म्हटल्याने यूजर्स तिची चांगलीच खिल्ली उडविणारे मेसेज शेअर करीत आहेत. तिला ट्रोल करताना यूजर्स म्हणत आहेत की, ‘तू ओव्हर अ‍ॅक्टिंगचे ट्रेनिंग वरुण धवनकडून घेतले आहे काय? तर कोणी तिच्या या डायलॉग खूपच अर्थहीन म्हणत आहेत. 
 }}}} ">Me and my friend, when teacher asks kya baatein krte rahte ho sara din? -
"Our business is our business, its none of your business"#Race3MostViewedTrailerIn24Hrs#Race3Trollspic.twitter.com/78gDewWOWf

— Himanshu Nager (@naagerhimanshu) May 17, 2018
डेजीच्या या डायलॉगवरून तिला केले जात असलेले ट्रोल पाहता आता सलमान खान तिच्या बचावासाठी समोर आला आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला असून, त्यामध्ये कोणीतरी त्याला विचारत आहे की, तू कुठे चाललास? त्यावर सलमान म्हणतो की, ‘आर बिझनेस इज आर बिझनेस, नन आॅफ योर बिझनेस’ अशा पद्धतीने तो ट्रोलर्सला उत्तर देताना दिसत आहे. दरम्यान, डेजीच्या या डायलॉगला काही मजेशीर व्हिडीओचे एडिटिंग करून सोशल मीडियावर शेअर केले जात असल्याने सध्या तिचा हा डायलॉग चांगलाच चर्चेत आहे. 



दरम्यान, ‘किक’च्या यशानंतर सलमान खान आणि जॅकलिन ही ब्लॉकबस्टर जोडी दुसºयांदा अ‍ॅक्शन थ्रिलरमध्ये एकत्र बघावयास मिळत आहे. सलमान खान फिल्म्स आणि रमेश तौरानी निर्मित हा चित्रपट टिप्स फिल्म्स बॅनर अंतर्गत बनविण्यात आला आहे. ‘रेस’ फ्रेंचाईजीचा हा तिसरा चित्रपट आहे. चित्रपटात अनिल कपूर, बॉबी देओल, साकिब सलीम यांच्याही अत्यंत महत्त्वाच्या भूमिका आहेत. 
Web Title: Salman Khan's actress has fallen in love with this dialogue; Trailers took the spin!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.