अशा खास अंदाजात साजरा होणार ‘भाईजान’ सलमान खानचा बर्थ डे!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 02:07 PM2018-12-20T14:07:04+5:302018-12-20T14:09:23+5:30

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान येत्या २७ डिसेंबरला आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय. आता भाईजानचा वाढदिवस म्हटल्यावर पार्टी तर होणारच. तर या पार्टीची तयारी सुरू झाली आहे.

salman khans 53rd birthday plans revealed | अशा खास अंदाजात साजरा होणार ‘भाईजान’ सलमान खानचा बर्थ डे!!

अशा खास अंदाजात साजरा होणार ‘भाईजान’ सलमान खानचा बर्थ डे!!

googlenewsNext
ठळक मुद्दे दरवर्षीप्रमाणे यंदांही पनवेलस्थित फार्म हाऊसवर भाईजानच्या बर्थ डेची जंगी पार्टी रंगणार आहे. यासाठी संपूर्ण खान कुटुंब, सोबत काही मित्रमंडळी फॉर्म हाऊसवर मुक्काम ठोकणार आहे.

बॉलिवूडचा ‘दबंग खान’ सलमान खान येत्या २७ डिसेंबरला आपला ५३ वा वाढदिवस साजरा करतोय. आता भाईजानचा वाढदिवस म्हटल्यावर पार्टी तर होणारच. तर या पार्टीची तयारी सुरू झाली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदांही पनवेलस्थित फार्म हाऊसवर भाईजानच्या बर्थ डेची जंगी पार्टी रंगणार आहे. यासाठी संपूर्ण खान कुटुंब, सोबत काही मित्रमंडळी फॉर्म हाऊसवर मुक्काम ठोकणार आहे. यावेळी केवळ भाईजानचा वाढदिवसचं नाही तर ख्रिसमस आणि न्यू ईअरचेही सेलिब्रेशन होणार आहे.

या बर्थ डे सेलिब्रेशनचा प्लाननुसार, २४ डिसेंबरलाच सलमान आपल्या कुटुंबासोबत फार्महाऊसवर पोहोचणार आहे. त्यामुळे २४ ते २७ असे चार दिवस सेलिब्रेशन होईल. बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटीही या सेलिब्रेशनमध्ये सहभागी होतील.


तूर्तास सलमान आपल्या ‘भारत’ या चित्रपटाच्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण सलमानच्या वाढदिवसामुळे तूर्तास चित्रपटाचे शूटींग रोखण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ‘भारत’चा दिग्दर्शक अली अब्बास जफर याने स्वत:च ही माहिती दिली होती. भाईजान के बर्थ डे के महिने में कौन काम करता है भाई...असे त्याने म्हटले होते. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटासाठी सध्या सलमान खान प्रचंड मेहनत घेतोय. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘भारत’मध्ये सलमान खान १० वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. ‘भारत’ शिवाय सल्लू भाई ‘बिग बॉस’चे १२ वे सीझनही होस्ट करतो आहे.

Web Title: salman khans 53rd birthday plans revealed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.