Salman Khan will play 'Hei' in Aamir Khan's 'Mahabharat' | आमिर खानच्या 'महाभारत'मध्ये सलमान खान साकारणार 'ही' भूमिका

बॉलिवूडमधला मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानसध्या 'महाभारत'ला घेऊन चर्चेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात सलमान खानने काम करण्याची इच्छा जाहिर केली आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात आमिर खानच्या 'महाभारत' या चित्रपटात सलमान खान भगवान कृष्ण यांची भूमिका साकारु शकतो. 

मीडिया रिपोर्टनुसार या चित्रपटात आमिर खान 'कर्ण किंवा अर्जुना'च्या भूमिकेत आपल्याला दिसू शकतो. त्याचबरोबर असेही कळतेय की अमिताभ बच्चन यांना आमिर खानने धृतराष्ट्रची भूमिका साकारण्याची ऑफर दिली आहे. या चित्रपटात द्रौपदीची भूमिका दीपिका पादुकोणने साकारावी अशी आमिर खानची इच्छा आहे. दीपिका पादुकोणकडे द्रौपदीच्या भूमिकेसाठी नैसर्गिक आवाज आहे असे आमिरचे म्हणणे आहे. याचित्रपटाची सहनिर्माते मुकेश अंबानी आहेत. या चित्रपटाची निर्मिती करण्यासाठी मुकेश अंबानी १ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. हा चित्रपट पाच भागांमध्ये तयार करण्यात येणार आहे. प्रत्येक चित्रपट दोन वर्षांच्या कालावधी नंतर रिलीज केला जाणार आहे. याच चित्रपटामुळे आमिरने अंतराळवीर राकेश शर्मा याच्या बायोपिकमध्ये काम करण्यास नकार दिला, असे मानले जात आहे. त्यामुळे ठग्स ऑफ हिंदुस्ताननंतर आमिर खानने कोणताच चित्रपट साईन केलेला नाही. 

चर्चा खरी मानली तर आमिर आणि त्याच्या लेखकांच्या टीमने याची तयारीही सुरु केली आहे. पुण्याच्या लायब्ररीत असतील नसतील तितक्या महाभारतावरील  पुस्तकांचा आमिर व त्याची टीम फडशा पाडला आहे. एकंदर काय तर चित्रपटावरचे काम सुरु झाले आहे. पण खरी अडचण यानंतरची आहे. ‘महाभारतावर चित्रपट हे माझे स्वप्न आहे. पण यासाठी मला माझ्या आयुष्याची 15 ते 20 वर्षे द्यावी लागतील, हे मी जाणतो आणि त्यामुळे हा प्रोजेक्ट हाती घेण्यास घाबरतोयं,’ असे अलीकडे आमिर म्हणाला होता.

ALSO READ :  पार्किंगमधील एकसारख्या कार बघून सलमान खानचा झाला गोंधळ; मग काहीसे असे घडले?
Web Title: Salman Khan will play 'Hei' in Aamir Khan's 'Mahabharat'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.