Salman Khan was seen playing romance with Dixit in 'Pardes'. | 'परदेस' चित्रपटात माधुरी दीक्षितसोबत रोमांस करताना दिसणार होता सलमान खान..मग घडले असे काही

सलमान खान आणि शाहरुख खानला एकाच चित्रपटात पाहण्याची त्यांच्या फॅन्सची नेहमीच इच्छा असते. करण आणि अर्जुनच्या जोडीला आपण टीव्ही वर एकत्र धमाल करताना आपण भरपूर वेळ पाहिले आहे. त्याचबरोबर त्यांनी काही चित्रपटातसुद्धा एकत्र काम केले पण तुम्हाला माहिती आहे का जर सगळे व्यवस्थित जुळून आले असते तर १९९७ मध्ये प्रदर्शित झालेल्या परदेस चित्रपटात शाहरुख  आणि सलमान खान एकत्र दिसले असते. हो, हे खरं आहे  ह्याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक सुभाष घाई यांनी  चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगच्या वेळेस केले होता. ह्या चित्रपटासाठी सलमान खान आणि माधुरी दीक्षितला घेण्यात यावी अशी या चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊसची मागणी होती. त्यासाठी त्यांनी सुभाष घाईं वर दबाव देखील टाकला पण या चित्रपटात शेवटी शाहरुख खानबरोबर महिमा आणि अपूर्वा अग्निहोत्री दिसले.

सुभाष घाई पुढे म्हणाले "अनेक  चित्रपटा हिट झाल्यानंतर मुक्ता आर्टस्ची पहिला फ्लॉप चित्रपट ठरला तो म्हणजे 'त्रिमूर्ती'. हा चित्रपट फ्लॉप गेल्यानंतर इंडस्ट्री तुम्हाला आदर देत नाही मग मी निर्णय घेतला की मी माझ्या स्टाइलने चित्रपट लिहिला आणि तयार करेन. मग जशी माझी या चित्रपटाची स्क्रिप्ट लिहून पूर्ण झाली तशी मी चित्रपटासाठी कास्ट शोधण्यास सुरवात केली, माझ्या प्रॉडक्शन हाउसची इच्छा होती की शाहरुख बरोबर मी माधुरी आणि सलमान खानला एनआरआय च्या भूमकेत कास्ट करु. गंगाच्या भूमिकेसाठी मी माधुरीची निवड केली पण माझी अशी इच्छा होती की शाहरुख समोर कोणता तरी नवीन चेहरा असावा. शाहरुखचा त्रिमूर्ती चित्रपट फ्लॉप ठरला होता पण त्याचा दिलवाले दुल्हिनियाँ ले जाएंगे  हिट झाला होता आणि मला माहित होते की शाहरुख एक उत्तम कलाकार आहे. 

माझ्या ऑफिसच्या लोकांची ही इच्छा होती की शाहरुख सलमान आणि माधुरीने या चित्रपटात काम करावे जेणेकरुन हा चित्रपट मोठा वाटेल आणि ह्यातून त्रिमूर्ती चित्रपटामुळे झालेले नुकसान सुद्धा भरून निघेल. ते त्यांच्या जागेवर योग्य होते पण माझ्यातला दिग्दर्शक ह्या गोष्टीवर सहमत होत नव्हता. माझ्या मते स्क्रिप्टनुसार तीन मोठ्या कलाकारांना घेऊन चित्रपट करणे योग्य वाटत नव्हते. मला असे पाहिजे होते की एनआरआय च्या भूमिकेसाठी असलेले पात्र नुकतेच परदेशातून आलेले वाटले पाहिजे. माझ्यासाठी हे एक आव्हानच होते पण मी कसेबसे महिमा आणि अपूर्व अग्निहोत्रीला फायनल केले.
Web Title: Salman Khan was seen playing romance with Dixit in 'Pardes'.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.