रेमो डिसूजाने आणला भाईजान सलमान खानला राग!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2018 03:10 PM2018-09-23T15:10:10+5:302018-09-23T15:11:45+5:30

‘रेस3’ हा चित्रपट कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूजाने दिग्दर्शित केला होता. खरे तर सलमान खान ‘रेस 3’चे अपयश विसरून ‘भारत’मध्ये बिझी झाला. पण रेमो मात्र अद्यापही हे अपयश पचवू शकलेला नाही. 

salman khan is unhappy with remo dsouzas race 3 remark | रेमो डिसूजाने आणला भाईजान सलमान खानला राग!

रेमो डिसूजाने आणला भाईजान सलमान खानला राग!

googlenewsNext

यावर्षी ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमान खानच्या ‘रेस 3’ची बॉक्सआॅफिसवर काय अवस्था झाली, हे सगळेच जाणतात. या चित्रपटाला ना समीक्षकांनी वाखाणले ना, चाहत्यांना हा चित्रपट भावला. म्हणायला ‘रेस3’ने १०० कोटी रूपयांचा बिझनेस केला. पण सगळ्यांनीच या चित्रपटाला अतिशय सुमार ठरवले. केवळ सलमानच्या चाहत्यांमुळे हा चित्रपट तरला.
‘रेस3’ हा चित्रपट कोरिओग्राफर व दिग्दर्शक रेमो डिसूजाने दिग्दर्शित केला होता. खरे तर सलमान खान ‘रेस 3’चे अपयश विसरून ‘भारत’मध्ये बिझी झाला. पण रेमो मात्र अद्यापही हे अपयश पचवू शकलेला नाही. अलीकडे एका मुलाखतीत रेमो ‘रेस 3’वर बोलला होता. ‘शूटींगच्या वेळी चित्रपटात ऐनवेळी अनेक बदल केले गेले. यामुळे ‘रेस3’चे नुकसान झाले. चित्रपटाच्या ओरिजनल स्क्रिप्टमध्ये आधी सगळे कॅरेक्टर ग्रे होते. पण सलमान खानच्या एन्ट्रीसोबतच स्क्रिप्टमध्ये मोठे बदल केले गेले,’ असे रेमो म्हणाला होता. एकंदर काय तर ‘रेस 3’च्या अपयशाचे सर्व खापर रेमोने अप्रत्यक्षपणे सलमान खानच्या डोक्यावर फोडले होते. साहजिकच रेमोचे हे वक्तव्य भाईजानला चांगलेच झोंबले. ताजी खबर मानाल तर, रेमोच्या या वक्तव्यानंतर भाईजान प्रचंड संतापला आहे. इतके की, यापुढे कधीच रेमोसोबत काम न करण्याचा निर्णय भाईजानने म्हणे घेतलाय.
नुकतीच,‘रेस 3’चे प्रोड्यूसर रमेश तौरानी यांनी ‘रेस4’ची घोषणा केली होती. या चित्रपटात सलमान खान असणार, असे मानले जात आहे. पण रेमोच्या वक्तव्यानंतर ‘रेस 4’मधून त्याचा पत्ता कट झाल्याचे कळतेय. म्हणजे आता ‘रेस 4’ रेमो दिग्दर्शित करणार नाही.

Web Title: salman khan is unhappy with remo dsouzas race 3 remark

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.