या कारणामुळे सलमान खानने मानले शाहरुख खानचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2018 12:11 PM2018-09-07T12:11:18+5:302018-09-07T12:19:03+5:30

सलमानला त्याचा लाडका मित्र शाहरुखने नुकतीच एक मदत केली आहे आणि त्यासाठी सलमानने त्याचे आभार देखील मानले आहेत.

salman khan thank Shahrukh khan for adjusting Zero dates for Bharat | या कारणामुळे सलमान खानने मानले शाहरुख खानचे आभार

या कारणामुळे सलमान खानने मानले शाहरुख खानचे आभार

googlenewsNext

सलमान खान आणि शाहरुख खान गेल्या कित्येक वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीत आहेत. त्या दोघांनीही एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. आज बॉलिवूडमध्ये या दोन खानांचा चांगलाच दबदबा आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. सलमान आणि शाहरुखने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. खऱ्या आयुष्यात देखील ते एकमेकांचे चांगले फ्रेंड्स आहेत. सलमानला त्याचा लाडका मित्र शाहरुखने नुकतीच एक मदत केली आहे आणि त्यासाठी सलमानने त्याचे आभार देखील मानले आहेत.

भारत या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या चित्रपटाची स्टार कास्ट चांगलीच तगडी आहे. सलमान खान या चित्रपटात आपल्याला प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहे. या चित्रपटात प्रियांका चोप्रा मुख्य भूमिका साकारणार होती. पण या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू व्हायच्या काहीच दिवस आधी प्रियांकाने या चित्रपटाला रामराम ठोकला. आता चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काय होणार याचे चित्रपटाच्या टीमला टेन्शन आले असताना कॅटरिना कैफने या चित्रपटासाठी होकार दिला. कॅटरिनाच्या या निर्णयासाठी सलमानने कॅटरिनाचे आभार तर मानले आहेत पण त्याचसोबत त्याने शाहरुख खानचे देखील आभार मानले आहेत. 

कॅटरिना कैफ शाहरुख खानच्या झिरो या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षाच्या अखेरीपर्यंत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या जोरात सुरू आहे. पण तरीही शाहरुखने झिरो या चित्रपटाच्या तारखा सांभाळून कॅटरिनाला भारत चित्रपटात काम करायला मदत केली आहे. शाहरुखने सांभाळून घेतल्यामुळेच कॅटरिनाला भारत या चित्रपटात काम करणे शक्य झाले असल्याने सलमानने शाहरुखचे आभार मानले.

भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणाला केवळ पाच दिवस बाकी असताना प्रियांकाने या चित्रपटाला रामराम ठोकला. त्यामुळे सलमानने कॅटरिनाला या चित्रपटाबद्दल विचारले. कॅटरिनाने देखील लगेचच या चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला. शाहरुख खानमुळेच तिला हा निर्णय घेणे सोपे झाले. हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार आहे.   

Web Title: salman khan thank Shahrukh khan for adjusting Zero dates for Bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.