जाणून घ्या सलमान खानला कोणासोबत आवडतो वेळ घालवायला, कोणाला म्हणतोय तो मोस्ट लव्हिंग...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2019 12:07 PM2019-06-27T12:07:04+5:302019-06-27T12:09:23+5:30

सलमानचे सध्या इन्स्टाग्रामचे पोस्ट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, सलमान त्याच्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे.

Salman Khan spends time with his "most loving, loyal and selfless" one; check out who! | जाणून घ्या सलमान खानला कोणासोबत आवडतो वेळ घालवायला, कोणाला म्हणतोय तो मोस्ट लव्हिंग...

जाणून घ्या सलमान खानला कोणासोबत आवडतो वेळ घालवायला, कोणाला म्हणतोय तो मोस्ट लव्हिंग...

googlenewsNext
ठळक मुद्देसलमानसोबत त्याचा पाळीव कुत्रा दिसत असून त्याने या फोटोसोबत लिहिले आहे की, मोस्ट लव्हिंग, लॉयल, सेल्फलेस (अतिशय प्रेमळ, विश्वासू आणि निःस्वार्थ) जीवासोबत मी माझा वेळ घालवत आहे.

सलमान खानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. सलमानने बॉलिवूडमध्ये गेल्या काही वर्षांत त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. त्याचा भारत हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना खूपच चांगला प्रतिसाद मिळत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूपच चांगली कमाई करत आहे. 

सलमान हा मोठा स्टार असून त्याला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. त्यामुळे त्याच्याविषयी जाणून घ्यायची इच्छा त्याच्या फॅन्सना असते. त्यामुळे तो सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या नेहमीच संपर्कात असतो. सध्या तर तो सोशल मीडियावर चांगलाच अ‍ॅक्टिव्ह झाला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. कारण सलमान सध्या दररोज एक तरी फोटो अथवा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत आहे.

सलमानचे सध्या इन्स्टाग्रामचे पोस्ट पाहिले तर आपल्या लक्षात येईल की, सलमान त्याच्या फॅमिलीसोबत जास्तीत जास्त वेळ घालवत आहे. एवढेच नव्हे तर तो त्याच्या फिटनेसकडे जास्तीत जास्त लक्ष देत आहे. त्याने नुकताच इन्स्टाग्रामला पोस्ट केलेला एक फोटो त्याच्या चाहत्यांना चांगलाच आवडत आहे. या फोटोत त्याच्यासोबत त्याचा पाळीव कुत्रा दिसत असून त्याने या फोटोसोबत खूप छान कॅप्शन लिहिली आहे. त्याने कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, मोस्ट लव्हिंग, लॉयल, सेल्फलेस (अतिशय प्रेमळ, विश्वासू आणि निःस्वार्थ) जीवासोबत मी माझा वेळ घालवत आहे. सलमानचा हा फोटो काहीच तासांत 10 लाखांहून अधिक लोकांनी पाहिला असून आठ हजारांहून अधिक कमेंट्स या फोटोला मिळाल्या आहेत.

सलमान लवकरच प्रेक्षकांना दबंग 3 आणि इंशाअल्लाह या चित्रपटात पाहायला मिळणार असून या चित्रपटांवर सध्या तो काम करत आहे. दबंग हा प्रसिद्ध चित्रपटाचा दबंग 3 हा तिसरा भाग असून या चित्रपटाची त्याचे फॅन्स आतुरतेने वाट पाहात आहेत तर इंशाअल्लाह या चित्रपटात त्याची जोडी आलिया भटसोबत जमणार आहे. संजय लीला भन्साळी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून 2020 च्या ईदला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. 

Web Title: Salman Khan spends time with his "most loving, loyal and selfless" one; check out who!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.