‘भारत’च्या सेटवर दिसले सलमान खानचे नवे टॅलेंट, व्हायरल झाला व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2019 10:35 AM2019-01-14T10:35:00+5:302019-01-14T10:35:55+5:30

भाईजान सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण याऊपरही ‘भारत’च्या सेटवरचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात सलमान चुकत नाही. सध्या सलमानने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे.

salman khan shares a picture from the sets of film bharat | ‘भारत’च्या सेटवर दिसले सलमान खानचे नवे टॅलेंट, व्हायरल झाला व्हिडिओ!!

‘भारत’च्या सेटवर दिसले सलमान खानचे नवे टॅलेंट, व्हायरल झाला व्हिडिओ!!

googlenewsNext
ठळक मुद्देहोय, या व्हिडिओत सलमान क्रिकेट खेळताना दिसतोय. घामात भिजलेला सलमान चौकार, षटकार ठोकतोय, हे पाहून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय.

भाईजान सलमान खान ‘भारत’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. पण याऊपरही ‘भारत’च्या सेटवरचे फोटो, व्हिडिओ शेअर करण्यात सलमान चुकत नाही. सध्या सलमानने शेअर केलेल्या अशाच एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. या व्हिडिओत सल्लू मियांचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळतो आहे. भाईजानचा हा अंदाज ज्याने कुणी पाहिला, तो फिदा झाला. होय, या व्हिडिओत सलमान क्रिकेट खेळताना दिसतोय. घामात भिजलेला सलमान चौकार, षटकार ठोकतोय, हे पाहून हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होतोय. काही तासांत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे.
‘बीर्इंग सलमान भारत खेलेगा...’, असे कॅप्शन त्याने या व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिओ तुम्हीही पाहा आणि  कसा वाटला ते जरूर कळवा.


‘बिग बॉस 12’चे संपल्यानंतर सलमानने केवळ आणि केवळ ‘भारत’वर लक्ष केंद्रीत केले आहे. ‘भारत’बद्दल सांगायचे तर अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटासाठी सध्या सलमान खान प्रचंड मेहनत घेतोय. प्रियांका चोप्रा बाहेर पडल्यानंतर सलमानची लकी चार्म कॅटरिना कैफही या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तब्बू, जॅकी श्रॉफ आणि दिशा पाटनी हे अन्य कलाकारही यात महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

‘भारत’हा चित्रपट ‘आॅड टू माई फादर’ या कोरियन चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे़  यात सलमान २० ते ६० वयाचे अनेक टप्पे साकारताना दिसणार आहे़  म्हणजेच सलमानचे वेगवेगळे लूक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहेत़  प्राप्त माहितीनुसार, सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल. यातले एक लूक मॉडर्न असेल. याकाळात त्याला कॅटरिना व त्याचे प्रेम होईल आणि नंतर लग्न.   
 

Web Title: salman khan shares a picture from the sets of film bharat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.