Salman Khan shared photos with real heroes !! | सलमान खानने खऱ्या हिरोज्सोबतचा फोटो केला शेअर!!

सुुपरस्टार सलमान खानने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक फोटो शेअर केला. या फोटोमध्ये सलमान खानसह काही नवे चेहरे बघावयास मिळत आहेत. वास्तविक हे चेहरे त्या लोकांचे आहेत, ज्यांनी आपल्या आयुष्यात काही तरी वेगळे कर्तृत्व करून दाखविले आहे. यातील काहींनी तर इतरांच्या आयुष्यात बदल घडविण्यासाठी स्वत:चे आयुष्य वेचले आहे. हे सर्व लोक वास्तविक जीवनातील खरे हिरो आहेत. होय, सलमान खानने हा फोटो शेअर करताना त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘आता हीच योग्य वेळ आहे चांगले बघण्याची अन् चांगले करण्याची. मी काही हिरोज्ची स्टोरी येथे शेअर करणार. ज्यांनी आपल्या आयुष्यात काहीतरी नवे आणि हटके करून दाखविले आहे. काहींनी प्रोत्साहित केले, काहींनी स्वाभिमान दाखविला, काहींनी आपले स्थान इतरांना दिले, तर काहींनी हार न मानता प्रतिकूल परिस्थितीशी सामना केला. ‘बीर्इंग ह्यूमन’च्या माध्यमातून लवकरच सर्व डिटेल्स तुमच्यापर्यंत पोहोचविल्या जातील.’ 

सलमानने त्याच्या या भावना ट्विटच्या माध्यमातून शेअर केल्या. यावेळी सर्व हिरोज्सोबतचा एक फोटोही त्याने शेअर केला. सलमान सध्या त्याच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या तयारीला लागला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करणार आहेत. या चित्रपटाची घोषणा सलमान खानच्या बर्थ डेलाच केली होती. याअगोदर सलमान आणि अब्बासच्या जोडीने ‘टायगर जिंदा है’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘टायगर जिंदा है’ने बॉक्स आॅफिसवर जबरदस्त कमाई करीत कमाईचे रेकॉर्ड केले होते. प्रेक्षकांना हा चित्रपट खूपच भावला. 
 }}}} ">It’s time to #LookGoodDoGood for all of us. I'm going to be sharing stories of heroes who have gone several extra miles - put someone else first, shown courage, selflessness & managed to fight for their cause n stay true to everything they stand for - Details soon @bebeinghumanpic.twitter.com/P2PQfW8gUj

— Salman Khan (@BeingSalmanKhan) March 9, 2018
आता सलमान आणि अब्बासची जोडी पुन्हा एकदा ‘भारत’मधून एकत्र येत आहे. हा चित्रपट २०१४ मध्ये आलेल्या --- या कोरियन चित्रपटाचा अडॉप्टेशन आहे. चित्रपटाची शूटिंग अबूधाबी आणि स्पेनमध्ये केली जाणार आहे, तर चित्रपटाची काही दृश्ये पंजाब आणि दिल्लीतील काही लोकेशन्सवर शूट केली जाणार आहेत. हा चित्रपट ईदच्या पार्श्वभूमीवर २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 
Web Title: Salman Khan shared photos with real heroes !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.