सलमान खान म्हणतो,‘बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे असेल तर ‘या’ गोष्टीची गरज!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 05:05 PM2019-05-26T17:05:06+5:302019-05-26T17:05:54+5:30

सलमानने मीडियासह संवाद साधला. या संवादामध्ये अभिनय क्षेत्रात येणारी आगामी पिढी ही भूमिकेला आणि विषयाला महत्व देऊन आपली प्रसिद्धी मिळवू पाहते आहे का असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला.

Salman Khan says, 'If you want to stay in Bollywood then you need' things'! | सलमान खान म्हणतो,‘बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे असेल तर ‘या’ गोष्टीची गरज!

सलमान खान म्हणतो,‘बॉलिवूडमध्ये टिकून राहायचे असेल तर ‘या’ गोष्टीची गरज!

googlenewsNext

सध्या बॉलिवूडचा चुलबुल पांडे सलमान खान त्याचा आगामी चित्रपट ‘भारत’ च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. दरम्यान सलमानने मीडियासह संवाद साधला. या संवादामध्ये अभिनय क्षेत्रात येणारी आगामी पिढी ही भूमिकेला आणि विषयाला महत्व देऊन आपली प्रसिद्धी मिळवू पाहते आहे का असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला.


‘प्रसिद्धी ही नेहमीच कमी होत जाते आणि ती टीकवून ठेवण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते. माझ्या मते शाहरुख खान, आमिर खान, अक्षय कुमार आणि मी प्रसिद्धी बराच काळ टीकवली आहे. तसेच आम्ही पुढची काही वर्षे ती टीकवून ठेवण्याचा प्रयत्न देखील करत आहोत. मला असे काही सुपरस्टार माहित आहेत ज्यांच्या चित्रपटांनी काही कालावधीनंतर बॉक्स ऑफिसवर  केवळ ८-१० टक्के कमाई केली आहे. काही दिवसांनंतर हे आमच्यासोबतही होणार आहे. पण मला असे वाटत की ते अद्याप सुरू झालेले आहे’ असे सलमानने उत्तर दिले आहे.

दरम्यान सलमानने आमिरच्या एका मुलाखतीबद्दल देखील सांगितले. या मुलाखतीमध्ये आमिर म्हणाला, ‘एक दिवस असा येणार आहे की, त्याचा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर  फारशी कमाई करणार नाही आणि त्यासाठी त्याने त्याची मानसिक तयारी देखील केली असल्याचे सलमानने सांगितले.

सध्या सलमान त्याच्या ‘भारत’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केले असून चित्रपटात सलमान खान, कॅटरिना कैफ, सुनिल ग्रोवर, जॅकी श्रॉफ आणि तब्बू हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ५ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.
 

Web Title: Salman Khan says, 'If you want to stay in Bollywood then you need' things'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.