ठरले! सलमान खान- संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाचे नाव ठरले!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2019 01:02 PM2019-02-26T13:02:09+5:302019-02-26T13:06:52+5:30

तब्बल १९ वर्षांनंतर सलमान खान व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही जोडी एकत्र काम करणार आहे. हा चित्रपट संजय लीला भन्साळी स्वत: दिग्दर्शित करतील. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाचे नाव समोर आले आहे.

salman khan sanjay leela bhansali next movie to be called hum dil de chuke sanam 2 | ठरले! सलमान खान- संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाचे नाव ठरले!!

ठरले! सलमान खान- संजय लीला भन्साळींच्या चित्रपटाचे नाव ठरले!!

googlenewsNext
ठळक मुद्दे सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटानंतर लगेच तो ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे .

तब्बल १९ वर्षांनंतर सलमान खान व दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही जोडी एकत्र काम करणार आहे. सलमान व संजयचा हा चित्रपट एक बिग बजेट सिनेमा असणार आहे. ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्शने स्वत:  ट्वीटरवर याबाबतची घोषणा केली होती. हा चित्रपट संजय लीला भन्साळी स्वत: दिग्दर्शित करतील. प्रेमकथेवर आधारित या चित्रपटाबद्दलची ताजी बातमी म्हणजे, या चित्रपटाचे नाव समोर आले आहे.



होय, डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार, सलमान व भन्साळी लवकरच ‘हम दिल दे चुके सनम 2’ या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. सलमान व भन्साळी या जोडीचा १९९९ मध्ये प्रदर्शित ‘हम दिल दे चुके सनम’ हा चित्रपट सुपरडुपर हिट ठरला होता. या चित्रपटानंतर सलमान व भन्साळीची जोडीने कधीच एकत्र काम केले नाही. पण आता १९ वर्षांनंतर ही जोडी ‘हम दिल दे चुके सनम 2’ घेऊन येतेय. लवकरच या चित्रपटाचे शूटींग सुरु होईल, असेही कळतेय. ‘पद्मावत’नंतर भन्साळींचा हा एक मोठा प्रोजेक्ट असेल. साहजिकच, भन्साळींच्या प्रत्येक सिनेमात दिसतात तसे भव्य दिव्य सेट, शानदार कथा, शानदार गाणी असे सगळे प्रेक्षकांना पाहायला मिळेल, अशी आशा आहे. या चित्रपटात सलमानची हिरोईन कोण असेल, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. पण त्याचीही चर्चा सुरु झालीय. या चित्रपटात प्रियंका चोप्राची वर्णी लागेल, असे मानले जातेय.

सलमान खान सध्या ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. या चित्रपटानंतर लगेच तो ‘दबंग 3’चे शूटींग सुरु करणार आहे आणि कदाचित हा चित्रपट हातावेगळा केल्यानंतर सलमान भन्साळींसोबत काम करणार आहे.

Web Title: salman khan sanjay leela bhansali next movie to be called hum dil de chuke sanam 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.