Salman Khan is not the actor but the actor is Kabir Khan's favorite | सलमान खान नाही तर हा अभिनेता हा कबीर खानचा फेव्हरेट

दिग्दर्शक कबीर खान चित्रपट "१९८३"च्या विश्वविजेता क्रिकेट संघावर रणवीर सिंगबरोबर चित्रपट तयार करतो आहे. कबीर खानचे असे म्हणणे आहे की रणवीर त्याचा आवडता अभिनेता आहे. १९८३ मध्ये भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेल्या विश्व चषकाची कथा दिग्दर्शक कबीर खान पडद्यावर साकारण्यासाठी तयार झाला आहे.  ज्यामध्ये रणवीर सिंग त्यावेळेसचे कप्तान कपिल देव यांची भूमिका साकारतो आहे. कबीर खान नुकताच झालेल्या मिस दीवा ग्रँड फिनालेमध्ये जज म्हणून उपस्थित होता. त्यावेळेस त्यांना विचारले की या ऐतिहासिक गोष्टाची दिग्दर्शन करताना तुझ्या मनात काय भावना येतात? त्यावर कबीर म्हणाला की "१९८३ माझ्यासाठी सर्वात खास चित्रपट आहे, मी याकडे फक्त चित्रपट म्हणून पाहत नाही. १९८३ माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. माझ्याकडे चित्रपट येत राहतील आणि मी तयार करत राहिन  ते माझे काम आहे पण कधी कधी तुमच्याकडे असे काही प्रोजेक्ट येतात जे तुमच्या स्वतःच्या आयुष्यात ही खूप बदल घडवतात त्यातून तुम्हाला भरपूर शिकायला मिळते अनुभवायला मिळते. त्यापैकी असा हा १९८३ चित्रपट माझ्यासाठी आहे". 

ALSO READ  :  ​रणवीर सिंग झाला जखमी अन् ‘पद्मावती’चा झाला फायदा; जाणून घ्या कसा?

पुढे कबीरला चित्रपट पद्मावतीच्या ट्रेलरबद्दल विचारले असता तो म्हणाला "मला पद्मावतीचा ट्रेलर आणि रणवीरचा लूक फार आवडला, मला खरच रणवीर खूपच आवडतो  मी त्याचा फॅन आहे आणि मी माझा पुढचा चित्रपट त्याच्याबरोबर करतोय. तसेच चित्रपट पद्मावतीचा ट्रेलर जसा शानदार आहे तशीच त्याची कथा पण चांगली असेल".
पद्मावतीमध्ये रणवीर सिंग निगेटीव्ह शेड्समध्ये दिसणार असला तरी त्याचे हे लूक लोकांना मनापासून भावले आहे. व्यक्तिरेखेनुसार, रणवीर यात काहीसा भयावह दिसतोय. केवळ दाढीचं नाही तर त्याचे केसही वाढलेले आहेत. चेह-यावर मोठ्या जखमेचा एक व्रण आहे. अर्थात तरिही रणवीरचे हे लूक प्रचंड प्रभावित करणारे आहे. सोशल मीडियावर त्याचे हे लूक प्रचंड हिट झाले आहे. यात रणवीरसोबत दीपिका पादुकोण आणि शाहिद कपूरही दिसणार आहेत.  हा चित्रपट 1 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
Web Title: Salman Khan is not the actor but the actor is Kabir Khan's favorite
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.