Salman Khan 'Meharban'! Mauni Rai got third film !! | ​सलमान खान ‘मेहरबान’! मौनी रायला मिळाला तिसरा चित्रपट!!

‘दबंग3’ या चित्रपटासाठी असलेला दुस-या हिरोईनचा शोध अखेर संपला.  ‘दबंग3’ला हिरोईन मिळालीय. ही हिरोईन म्हणजे,‘नागीन’ बनून छोट्या पडद्याच्या प्रेक्षकांना वेड लावणारी मौनी राय. चर्चा खरी मानाल तर, सोनाक्षी सिन्हानंतर ‘दबंग3’साठी मौनीला साईन करण्यात आलेय.
‘नागीन’ या मालिकेने घराघरात पोहोचलेली मौनी राय छोट्या पडद्यावरची टॉप अ‍ॅक्ट्रेस मानली जाते. पण गेल्या काही दिवसांत ती बॉलिवूडमध्ये अ‍ॅक्टिव्ह झाली आहे. अक्षय कुमारसोबत ‘गोल्ड’ या चित्रपटात मौनी दिसणार आहे. यानंतर रणबीर कपूर व आलिया भट्टच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्येही तिची वर्णी लागली आहे. आता मौनीवर सलमान खान ‘मेहरबान’ झालाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मौनी राय ‘दबंग3’या चित्रपटात कॅमिओ रोलमध्ये दिसेल. ‘दबंग’चा चुलबुल पांडे आणि ‘दबंग2’मधील रॉबिन हुड पांडे बनलेल्या सलमान खानच्या जुन्या प्रेयसीच्या रूपात ती झळकेल. मौनीचा चित्रपटातील हा सीक्वेंस किमान १५ ते २० मिनिटांचा असेल.

मौनी राय ही सलमानच्या गोटातली, सलमानच्या अगदी जवळची मानली जाते. सलमानच्या पार्ट्यांमध्ये कायम मौनी हजर असते. सुरुवातीला सलमान हाच मौनीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार, अशी चर्चा होती. पण सलमानने लॉन्च करण्याआधीच मौनीने अक्षय कुमारचा ‘गोल्ड’ साईन केला. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.मौनीने ‘क्योंकी साँस भी बहु थी’ या मालिकेपासून टीव्ही करिअरला सुरूवात केली होती.त्यानंतर ‘जरा नच के दिखा’मध्ये कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. ‘देवों के देव महादेव’, ‘बिग बॉस 8’अशा अनेक शोमधून मौनीने स्वत:ची छाप पाडली होती. त्या सगळ्या भूमिकांमुळेच आज मौनीला छोटा पडदा ते रूपेरी पडदा हा पल्ला गाठणे शक्य झाले आहे. 
‘दबंग3’बद्दल सांगायचे तर, या चित्रपटात सोनाक्षी सिन्हाही लहानशा भूमिकेत दिसेल. यातही ती ‘रज्जो’चे पात्र साकारताना दिसेल. सुप्रसिद्ध दिग्दर्शक प्रभु देवा हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहे. यंदा जूनपासून या चित्रपटाचे शूटींग सुरू होणे अपेक्षित आहे. 

ALSO READ : ‘नागीन’च्या आठवणीने भावूक झाली मौनी राय! एकताचे मानले आभार!!
 
Web Title: Salman Khan 'Meharban'! Mauni Rai got third film !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.