या कारणामुळे सलमान खानला सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 09:00 PM2018-12-13T21:00:00+5:302018-12-13T21:00:02+5:30

नंदिता मेहतानीच्या पार्टीला जातानाचे सलमानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सलमान चांगलाच चिडलेला दिसत आहे. पण यावरून सलमानला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरण्यात आलेले आहे.

Salman Khan got trolled on social media | या कारणामुळे सलमान खानला सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल

या कारणामुळे सलमान खानला सोशल मीडियावर करण्यात आले ट्रोल

googlenewsNext
ठळक मुद्देसोशल मीडियावर सलमानचे हे पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एका युझरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, हा नेहमीच रागात असतो... स्वतःला खूप अकड असल्यासारखा दाखवतो. पण अंबानीच्या पार्टीत जाऊन बॅकराऊंड डान्सर म्हणून नाचतो.

कोणत्याही बॉलिवूड कलाकाराला सोशल मीडियावर नेटिझन्सनी ट्रोल करणे यात काही नवीन नाही. आता सलमान खानला नेटिझन्सने धारेवर धरले आहे. सलमान खान नुकताच फॅशन डिझायनर नंदिता मेहतानीच्या वांद्रे येथील घरी एका पार्टीसाठी आला होता. सलमान नेहमीच खूप चांगल्या मुडमध्ये असतो. पण नंदिताकडे जाताना त्याचा मुड नेहमीसारखा दिसला नाही. या पार्टीला जातानाचे सलमानचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सलमान चांगलाच चिडलेला दिसत आहे. पण यावरून सलमानला सोशल मीडियावर चांगलेच धारेवर धरण्यात आलेले आहे.

सोशल मीडियावर सलमानचे हे पोस्ट आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यावर एका युझरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, हा नेहमीच रागात असतो... स्वतःला खूप अकड असल्यासारखा दाखवतो. पण अंबानीच्या पार्टीत जाऊन बॅकराऊंड डान्सर म्हणून नाचतो. एवढेच नव्हे तर सलमानचा बॉडीगार्ड शेरा सध्या दिसत नाहीये. त्यामुळे तो काय करत आहे. तो सलमानसोबत का दिसत नाही असा प्रश्न देखील नेटिझन्सने विचारले आहे. नेटिझन्सने सध्या शेरा कुठे गेला आहे असे प्रश्न सलमानला विचारले आहेत. 

इशा अंबानी आणि आनंद पिरामल याच्या लग्नाच्याआधीचे विधी नुकतेच पार पडले आहेत. त्यांच्या संगीत सेरेमनीला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती. तसेच अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय यांसारख्या अनेक सेलिब्रेटींनी परफॉर्मन्स सादर केला. सलमान देखील एका गाण्यावर थिरकला होता. पण सलमान स्टेजवर परफॉर्मन्स सादर करत असताना मुकेश अंबानीच्या मुलाने एंट्री केली आणि सलमान मागे झाला आणि तो मागे उभा राहून डान्स करू लागला. यावरूनच सलमान तिथे बॅकराऊंड डान्सर होता असे त्याला नेटिझन्सने हिणवले आहे.

सलमान सध्या त्याच्या भारत या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणातून वेळ काढून त्याने इशा आणि आनंदच्या प्री-वेडिंग फंक्शनना हजेरी लावली होती. सलमानला नेटिझन्सने धारेवर धरल्यानंतर सलमान या सगळ्यावर काय प्रतिक्रिया देतो हे पाहाणे रंजक असणार आहे.  
 

Web Title: Salman Khan got trolled on social media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.