Salman Khan got the name 'Bhaijan' | या व्यक्तीमुळे सलमान खानला मिळला 'भाईजान' हे नाव

दबंग खान अर्थात सलमान खानला इंडस्ट्रीत अनेक नावाने ओळखले जाते. अनेक फॅन्सचा तो 'भाईजान आहे. सलमान आता सगळ्यांचाच भाईजान बनला आहे. छोटा पडदा असो किंवा मोठा पडदा सगळेच त्याला भाईजान म्हणूनच ओळखतात. आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की सलमनाला भाईजान हे नाव नक्की कुणी दिले ? या गोष्टीचा खुसाला सलमानचे एक इव्हेंटमध्ये केला आहे.  

सलमान म्हणाला माझा लहान भाऊ सोहेल खान मला लहानपणापासून भाई म्हणून आवाज देतो. सोहेलची मुलंनंतर मला याच नावाने आवाज देऊ लागले. अशा पद्धातीने संपूर्ण इंडस्ट्रीचा मी भाईजान झालो. पुढे तो म्हणाला सल्लू भाई पासून भाईजानपर्यंत प्रवास आठवणीत राहण्यासारखा होता.  

ऐवढेच नाही तर सलमानने आपल्या लग्नाला घेऊनसुद्धा याठिकाणी खुलासा केला. सलमान म्हणाला की तो लग्न ही गोष्ट मला परवडण्यासारखी नाही आहे म्हणून मी लग्न करत नाही आहे. सलमानच्या म्हणण्यानुसार लग्नात होणारा खर्च बघून त्याला सिंगल राहवास वाटते आहे. 

ALSO READ :   सलमान खान विसरला नाही ‘तो’ अपमान! अरिजीत सिंहला पुन्हा दाखवला बाहेरचा रस्ता!!

सध्या सलमान रेस च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे. 'रेस 3' मध्ये सलमानसोबत जॅकलिन फर्नांडिस दिसणार आहे. हा चित्रपट 15 जूनला ईदच्या दिवशी रिलीज होणार आहे. 'रेस 3' मध्ये बॉबी देओल आणि डेजी शाहची देखील महत्त्वाची भूमिका आहे. त्यानंतर तो भारतमध्ये दिसणार आहे.  चित्रपट भारत बद्दल बोलायचे झाले तर त्याचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करतो आहे. अभिनेता व निर्माता अतुल अग्निहोत्री (सलमानची बहीण अलविरा खान हिचा पती) दीर्घकाळापासून या चित्रपटाचे प्लानिंग करतोय. सध्या या चित्रपटाची तयारी जोरात सुरु आहे.  यात सलमान 18 वर्षांचा दिसणार आहे. मैने प्यार किया’मध्ये जो सलमान आपण पाहिलात, अगदी तसा सलमान ‘भारत’मध्ये आपल्याला दिसणार आहे. या टेक्निकसंदर्भात मेकर्सनी व्हिएफएक्स टीमसोबत चर्चा केली.आता यंग दिसायचे तर वजनही कमी करणे आलेच. त्यानुसार, पुढच्या काही आठवड्यात सलमानला वजनही कमी करावे लागणार आहे.
Web Title: Salman Khan got the name 'Bhaijan'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.