Salman Khan gave a talk about marriage; Said, 'Could not afford wedding expenses'! | सलमान खानने लग्नाच्या चर्चेला दिला पूर्णविराम; म्हटले, ‘लग्नाचा खर्च परवडणार नाही’!

अभिनेता सलमान खानचे चाहते थेट त्याच्या आयुष्याशी जोडलेले आहेत. नुकतेच सलमान खानने काही माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्याच्या व्यक्तिगत आयुष्याशी संबंधित काही गोष्टींचा उलगडा केला. मीडियाशी बोलताना सलमान खानने आपल्या स्माइलने उपस्थितांची मने जिंकली. यावेळी सलमान फनकी लूकमध्ये बघावयास मिळत होता. यावेळी सलमानने बीइंग ह्यूमनचे टी-शर्ट, ब्लॅक कलरची जिंस आणि जॅकेट घातले होते. सलमानला बॉलिवूडमध्ये ‘भाई’ या नावाने ओळखले जाते. याविषयी जेव्हा सलमानला विचारण्यात आले तेव्हा त्याने ‘भाई’ या शब्दामागचे रहस्य उघड केले. 

सलमान खानने म्हटले की, माझा लहान भाऊ सोहेल खान मला ‘भाई’ या नावाने बोलावितो. त्यामुळे त्याचे मित्रदेखील मला ‘भाई’ या नावानेच बोलावितात. आता तर इंडस्ट्रीमधील सिनियर्स मंडळीदेखील मला भाई या नावाने संबोधत आहे. त्यामुळे माझ्या नावासमोर ‘भाई’ हा शब्द जोडला गेला. यावेळी सलमानने ‘सल्लू’ या टोपणनावाबद्दलही सांगितले. सलमानने म्हटले की, भाई नावा अगोदर मला ‘सल्लू’ म्हणून बोलाविले जात असे. अशाप्रकारे सलमान या नावानंतर सल्लू अन् आता भाई असे शब्द माझ्या नावासमोर जोडले गेले. सलमानच्या या खुलाशाचा व्हिडीओ हंगामा यू-ट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, सलमान खानला कुठल्याही मुलाखती किंवा टॉक शोदरम्यान विचारला जाणारा प्रश्न हा त्याच्या लग्नावरून असतो. यावेळेसदेखील जेव्हा सलमानला त्याच्या लग्नाविषयी विचारण्यात आले तेव्हा सलमानने म्हटले की, ‘लग्न ही खूप मोठी गोष्ट आहे. तुम्हाला लग्न करण्यासाठी लाखों किंवा कोट्यवधी रूपये खर्च करावे लागतात. मला हा खर्च परवडणार नाही.’ यावेळी सलमान आपल्या वडिलांचे उदाहरण देताना म्हटले की, त्यांनी १८० रूपयांत लग्न केले होते. शिवाय माझ्या पाच भावा-बहिणींनाही चांगल्या पद्धतीने सांभाळ केला.  

Web Title: Salman Khan gave a talk about marriage; Said, 'Could not afford wedding expenses'!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.