सलमान खानची हिरोईन रंभा बनली तिसऱ्यांदा आई, मुलाला दिला जन्म!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2018 08:51 AM2018-09-25T08:51:39+5:302018-09-25T08:53:49+5:30

सलमान खानची हिरोईन रंभा आठवतेय? होय, ‘बंधन’, ‘जुडवा’ या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली तीच ती रंभा. रंभा तिस-यांदा आई बनली आहे. २३ सप्टेंबरला रंभाने मुलाला जन्म दिला.

salman khan film judwaaa actress rambha blessed with baby boy | सलमान खानची हिरोईन रंभा बनली तिसऱ्यांदा आई, मुलाला दिला जन्म!

सलमान खानची हिरोईन रंभा बनली तिसऱ्यांदा आई, मुलाला दिला जन्म!

googlenewsNext

सलमान खानची हिरोईन रंभा आठवतेय? होय, ‘बंधन’, ‘जुडवा’ या सिनेमात सलमान खानसोबत झळकलेली तीच ती रंभा.रंभा तिस-यांदा आई बनली आहे. २३ सप्टेंबरला रंभाने मुलाला जन्म दिला. रंभाच्या पतीने तिच्या सोशल अकाऊंटवर ही गोड बातमी शेअर केली आहे. रंभाने फार कमी चित्रपट केलेत. पण जे केलेत ते सगळे बड्या-बड्या स्टार्ससोबत केलेत. सलमानपासून, अनिल कपूर, अजय देवगण अशा अनेकांसोबत ती दिसली. लग्नानंतर रंभा संसारात अशी काही रमली की, तिने चित्रपटांना रामराम ठोकला. रंभाला आधीच दोन मुली आहेत. पहिली मुलगी लान्या ७ वर्षांची असून साशा ३ वर्षांची आहे. आता रंभा तिस-यांदा आई झाली आहे.

नुकतेच तिचे डोहाळ जेवण थाटामाटात पार पडले होते. चित्रपटांपासून दूर गेल्यानंतर ८ एप्रिल २०१० रोजी रंभाने बिझनेसमॅन इंद्राण पद्मनाथनसोबत लग्न केले. रंभाला दोन मुली आहेत. लान्या आणि साशा. २०११ मध्ये लान्याचा जन्म झाला तर २०१५ मध्ये साशा जन्मली. सोशल मीडियावर रंभा कमालीची अ‍ॅक्टिव्ह आहे. फेसबुक व इन्स्टाग्रामवर ती आपले व कुटुंबाचे अनेक फोटो शेअर करत असते. रंभाचा पती मॅजिकवुड्स नामक कंपनीचा चेअरमन व सीईओ आहे. कॅनडास्थित ही कंपनी किचन कॅबिनेट आणि व्हॅनिटी व्हॅन बनवते. मध्यंतरी रंभा व तिच्या पतीत मतभेद असल्याची बातमी समोर आली होती. दोघांचेही प्रकरण घटस्फोटापर्यंत ताणले गेले होते. पण कालांतराने हे मतभेद मिटलेत. आता रंभा आपल्या संसारात आनंदी आहे. रंभाने वयाच्या सोळाव्या वर्षी आपला पहिला चित्रपट साईन केला होता. १९९५ मध्ये ‘जल्लाद’ या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड एन्ट्री घेतली. यानंतर ‘दानवीर’,‘जंग’,‘कहर’,‘जुडवां’,‘सजना’,‘घरवाली बाहरवाली’,‘बंधन’,‘मैं तेरे प्यार में पागल’,‘क्रोध’,‘बेटी नंबर वन’,‘दिल ही दिल में’,‘प्यार दिवाना होता है’ अशा अनेक चित्रपटांत रंभा दिसली. एकेकाळी रंभाला दिव्या भारतीची डुप्लिकेट म्हणून ओळखले जात होते.

Web Title: salman khan film judwaaa actress rambha blessed with baby boy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.