भाईजान सलमान खानला वाटतेय ‘हा’ अभिनेता असेल भावी सुपरस्टार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2019 05:58 PM2019-06-02T17:58:15+5:302019-06-02T17:59:01+5:30

बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार उदयाला येत आहेत, त्यापैकी कोणता कलाकार पुढे जाऊन मोठा, दिग्गज सुपरस्टार होईल असं वाटतं ?’ असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता सलमानने सरळ वरुण धवनचं नाव घेतलं. त्याच्यामते पुढील काळामध्ये वरुण धवन हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा सुपरस्टार होईल.

Salman Khan feels 'this' actor will be a superstar! | भाईजान सलमान खानला वाटतेय ‘हा’ अभिनेता असेल भावी सुपरस्टार!

भाईजान सलमान खानला वाटतेय ‘हा’ अभिनेता असेल भावी सुपरस्टार!

googlenewsNext

अभिनेता सलमान खान याने आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक स्ट्रगर्ल्सला संधी दिली. अनेकांना काम मिळवून दिले. सगळया कलाकारांच्या दृष्टीने भाईजान सलमान म्हणून इंडस्ट्रीत सर्वांसाठी तारक आहे. १९८८ साली ‘बीवी हो तो ऐसी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या  सलमानचं आज बॉलिवूडमध्ये आणि चाहत्यांच्या मनावर वर्चस्व आहे. त्यामुळेच त्याचे अनेक चाहते आहेत. मात्र बदलत्या काळानुसार कलाविश्वामध्ये अनेक नवोदित कलाकारांची रेलचेल होतांना दिसते. त्यामुळे सध्याच्या घडीला अनेक कलाकार सुपरस्टार होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सलमानने पुढच्या पिढीमधील कोणता कलाकार खऱ्या  अर्थाने सुपरस्टार होईल हे सांगितलं आहे.

सध्या सलमान आणि कॅटरिना कैफ त्यांच्या आगामी ‘भारत’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट ५ जून रोजी ईदच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यानिमित्ताने कॅटरिना, सलमान जोरदार प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या दोघांनी एक मुलाखत दिली. यावेळी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना सलमानने पुढील सुपरस्टार कोण असेल हे सांगितलं.

‘बॉलिवूडमध्ये अनेक कलाकार उदयाला येत आहेत, त्यापैकी कोणता कलाकार पुढे जाऊन मोठा, दिग्गज सुपरस्टार होईल असं वाटतं ?’ असा प्रश्न सलमानला विचारण्यात आला होता. यावेळी क्षणाचाही विलंब न लावता सलमानने सरळ वरुण धवनचं नाव घेतलं. त्याच्यामते पुढील काळामध्ये वरुण धवन हा बॉलिवूडमधील सर्वात मोठा सुपरस्टार होईल.

‘सध्या बॉलिवूडमध्ये जी नवी पिढी येत आहे, त्यामध्ये वरुण धवन हा मला उत्तम कलाकार असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं,’ असं सलमानने सांगितलं. विशेष म्हणजे २०१७ साली ‘जुडवा २’ या चित्रपटामध्ये सलमान- वरुणने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. दरम्यान, सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार असून या चित्रपटामध्ये कलाकारांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात कॅटरिना कैफ, दिशा पटानी, जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोवर, तब्बू या कलाकारांची मांदियाळी आहे. विशेष म्हणजे या चित्रपटामध्ये सलमान वेगवेगळ्या लूक्समध्ये दिसून येणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता कमालीची शिगेला पोहोचली आहे.

Web Title: Salman Khan feels 'this' actor will be a superstar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.