सलमान खानला कॅटरिना कैफचा पुळका, म्हणे, रणबीर कपूरसोबतची ती ती नाहीच!!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 12:33 PM2019-02-08T12:33:48+5:302019-02-08T12:34:14+5:30

कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले.

salman khan defended katrina kaif on her leaked bikini pictures with ranbir kapoor | सलमान खानला कॅटरिना कैफचा पुळका, म्हणे, रणबीर कपूरसोबतची ती ती नाहीच!!

सलमान खानला कॅटरिना कैफचा पुळका, म्हणे, रणबीर कपूरसोबतची ती ती नाहीच!!

googlenewsNext
ठळक मुद्दे होय, या फोटोंत रणबीर व कॅट एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. हे फोटो लीक झाल्यानंतरच रणबीर व कॅटच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले होते.

सलमान खानचा आगामी चित्रपट ‘भारत’ यावर्षी ईदच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या चित्रपटात भाईजान सलमान पुन्हा एकदा त्याची लकी चार्म कॅटरिना कैफसोबत आॅनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. पुढे अगदी चित्रपटांत शोभावे तसे कॅट व रणबीरचेही ब्रेकअप झाले आणि कॅट पुन्हा भाईजानच्या जवळ आली. कदाचित म्हणूनच प्रसंग कुठलाही असो, भाईजान कॅटच्या मदतीला तत्पर असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. विश्वास बसत नसेल तर कॅट व रणबीरच्या ‘त्या’ वादग्रस्त फोटोंचेच उदाहरण घ्या.

 होय, या फोटोंत रणबीर व कॅट एकत्र सुट्टी एन्जॉय करताना दिसले होते. हे फोटो लीक झाल्यानंतरच रणबीर व कॅटच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाले होते. पण आता सलमान भाईचे मानाल तर, या फोटोतील रणबीरसोबतची मुलगी कॅटरिना नाहीच. होय,अलीकडे एका ताज्या मुलाखतीत सलमानने हा दावा केला. रणबीर व कॅटचे ते फोटो बनावट आहेत्, असे त्याने म्हटले.

‘ते फोटो दुसरे काही नसून निव्वळ पब्लिसिटी स्टंट होता. ते फोटो नकली होते, असे मला वाटते. फोटोतील मुलगा रणबीर असू शकतो पण त्याच्यासोबतची ती मुलगी कॅटरिना वाटत नाही. म्हणजे चेहरा कॅटरिनाचा आणि बॉडी दुसºया कुणाची. कुणीतरी हे फोटो मॉर्फ्ड केले असावेत,’ असे सलमान म्हणाला. तो केवळ इथेच थांबला नाही तर यापुढे जात अशाप्रकारे फोटो मॉर्फ्ड करणाºयांवरही तो घसरला. कुणी पर्सनल हॉलीडेवर गेले असताना त्यांचे  असे फोटो काढणे अत्यंत घाणेरडा प्रकार असल्याचे तो म्हणाला. आपल्या आया-बहिणींसोबत असे घडले तर तुम्ही काय कराल? असा संतप्त सवालही त्याने केला. त्याच्या या बोलण्यावरून एकच दिसले. ते म्हणजे, कॅटरिनावरचा अतिविश्वास आणि तिची अतिकाळजी. आहे ना मजेदार...

Web Title: salman khan defended katrina kaif on her leaked bikini pictures with ranbir kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.