Salman Khan broke his X girlfriends head on a coke bottle? | ​सलमान खानने त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच्या डोक्यावर फोडली होती कोकची बॉटल?

सलमान खानचे आजवर संगीता बिजलानी, सोमी अली, ऐश्वर्या राय, कतरिना कैफ यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे प्रेमप्रकरण गाजले आहे. ऐश्वर्यासोबत असलेल्या त्याच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा आजही मीडिया मध्ये होते. आज त्याच्या आयुष्यात आलेल्या बहुतांश अभिनेत्री आयुष्यात सेटल झाल्या आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का सोमी अली ही अभिनेत्री सलमानच्या प्रेमात आकंठ बुडाली होती आणि तिने आजही सलमानमुळेच लग्न केलेले नाही. 
सोमी अली केवळ पंधरा वर्षांची असताना सलमान आणि तिची भेट झाली होती. ती मुळची पाकिस्तानची होती. सलमान चित्रपटसृष्टीत आल्यानंतर सोमी आणि त्याची ओळख झाली होती. सलमानच्या अभिनयावर ती प्रचंड फिदा होती. केवळ सलमानसाठी ती बॉलिवूडमध्ये आली होती. सलमानसोबत लग्न करायला मिळावे यासाठी ती फ्लोरिडा येथून भारतात आली होती आणि तिने चित्रपटांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. सलमान आणि सलमानच्या कुटुंबियांसोबत तिची चांगलीच दोस्ती जमली होती. त्याकाळात सलमान आणि संगीता बिजलानी नात्यात होते. पण सोमी अलीच्या सलमान प्रेमात पडल्यामुळे सलमानने संगीतासोबत ब्रेक अप केले होते. सोमी आणि सलमान यांच्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. पण त्याच वेळी ऐश्वर्याच्या मागे सलमान वेडा झाला. सलमान ऐश्वर्यात गुंततो आहे हे सोमीच्या लक्षात आल्यानंतर सोमी सलमानला सोडून परदेशात निघून गेली.

salman khan somy ali

सलमान आणि सोमी नात्यात असताना सलमानने सोमीच्या डोक्यावर कोकची काचेची बॉटल फोडली होती अशी त्यावेळी मीडियात चांगलीच चर्चा रंगली होती. पण सोमीने काही वर्षांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत याविषयी सांगितले होते. ती सांगते, सलमानने माझ्या डोक्यावर काचेची बॉटल फोडली असती तर मी नक्कीच रक्तबंबाळ झाले असते. सलमानने मला मारले ही जी काही त्याकाळात मीडियात चर्चा रंगली होती ती खूपच चुकीची होती. मी आयुष्यात पहिल्यांदा दारू प्यायली होती आणि हीच गोष्ट सलमानला न आवडल्याने सलमानने रागात टेबलवर कोक ओतले होते. तो कितीही चिडलेला असला तरी त्याने कधीच माझ्यावर हात उचलला नाही. मीडियाने चुकीच्या बातम्या का पसरवल्या हेच मला कळले नाही.  

Also Read : ​​सलमान खानच्या या पूर्वप्रेयसीमुळे सलमान बनला चांगला डान्सर
Web Title: Salman Khan broke his X girlfriends head on a coke bottle?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.