Like Salman Khan, Arbaaz Khan is in a relationship with a Romanian girl! | भाऊ सलमान खानप्रमाणेच रोमानियन मुलीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे अरबाज खान!

बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचे रोमानियन ब्यूटी यूलिया वंतूर हिच्यासोबतच्या रोमान्सच्या चर्चा जोरदार रंगत आहेत. वास्तविक या दोघांनी अद्यापपर्यंत त्यांच्यातील नाते जाहीर केले नाही. परंतु हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याचे सर्वत्र बोलले जाते. आता अरबाज खाननेही भावाच्या पावलावर पाऊल ठेवले आहे. होय, अरबाजही एका रोमानियन मुलीला डेट करीत आहे. या दोघांचे बरेचसे फोटोही समोर आले आहेत. अशात हे दोघे रिलेशनशिपमध्ये आहेत काय? याबाबतचा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. उपलब्ध माहितीनुसार, सध्या अरबाजचे नाव एलेक्जेंड्रा कॅमेलिया हिच्याशी जोडले जात आहे. कारण अरबाजच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर नजर टाकल्यास बहुतांश फोटोंमध्ये एलेक्जेंड्रा बघावयास मिळते. शिवाय अरबाजनेही त्याच्या एका मुलाखतीत स्पष्ट केले की, तो एका मुलीला डेट करीत आहे. एका एंटरटेन्मेंट वेबसाइटने दावा केला की, अरबाज आणि एलेक्जेंड्राने काही दिवसांपूर्वीच मुंबईतील एका आलिशान रेस्टॉरंटमध्ये एकत्र रात्र काढली होती. यादरम्यान दोघांना एकमेकांचा हातात हात घेऊन बघण्यात आले होते. पत्नी मलाइका अरोरा हिच्याशी घटस्फोट घेतल्यानंतर अरबाज त्याचे आयुष्य स्वतंत्रपणे बघू इच्छितो. अरबाज आणि मलाइकाचे लग्न १९९७ मध्ये झाले होते. परंतु याच वर्षाच्या सुरुवातीला हे दोघे विभक्त झाले. मात्र घटस्फोटानंतरही हे दोघे बºयाचदा एकत्र बघावयास मिळाले. अशात हे दोघे पुन्हा एकत्र येतील काय? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. परंतु अरबाज आता रोमानिया मुलीच्या प्रेमात पडल्याने तो मलाइकाला विसरेल, असेच काहीसे चित्र दिसत आहे. 
Web Title: Like Salman Khan, Arbaaz Khan is in a relationship with a Romanian girl!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.