पाहा, असा आहे अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतनच्या डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लूक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2018 02:42 PM2018-12-10T14:42:16+5:302018-12-10T14:47:49+5:30

सलमान खानचा मित्राचा मुलगा जहीर इक्बाल आणि अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन याच्या पहिल्या चित्रपटाच्या नावाची घोषणा झालीय. सलमान खान आपल्या होम प्रॉडक्शनमधून जहीरला लॉन्च करतोय. याच चित्रपटातून अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल हिचाही डेब्यू होतोय.

salman khan announces zaheer iqbal and pranutan bahls debut film notebook | पाहा, असा आहे अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतनच्या डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लूक!!

पाहा, असा आहे अभिनेत्री नूतन यांची नात प्रनूतनच्या डेब्यू चित्रपटाचा फर्स्ट लूक!!

googlenewsNext
ठळक मुद्देजहीर व प्रनूतनच्या या चित्रपटाचे ‘नोटबुक’ असे नामकरण करण्यात आले आहे.  पुढील वर्षी २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सलमान खानचा मित्राचा मुलगा जहीर इक्बाल आणि अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन याच्या पहिल्या चित्रपटाच्या नावाची घोषणा झालीय. सलमान खान आपल्या होम प्रॉडक्शनमधून जहीरला लॉन्च करतोय. याच चित्रपटातून अभिनेता मोहनीश बहलची मुलगी प्रनूतन बहल हिचाही डेब्यू होतोय. जहीर व प्रनूतनच्या या चित्रपटाचे ‘नोटबुक’ असे नामकरण करण्यात आले आहे.  पुढील वर्षी २९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. भाईजानची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शक नितीन कक्कर करणार आहे.




आज  ‘नोटबुक’चा फर्स्ट लूक जारी करण्यात आला. फर्स्ट लूक बघता हा चित्रपट एक रोमॅन्टिक लव्हस्टोरी असल्याचे दिसतेय. प्रनूतन ही अभिनेत्री नूतन यांची नात आहे. नूतन या आपल्या शानदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. प्रनूतनच्या नावातचं नूतन असल्याने साहजिकचं तिच्याकडून लोकांच्या भरपूर अपेक्षा राहणार आहेत. याशिवाय सध्याची लोकप्रीय अभिनेत्री काजोलसोबतही अप्रत्यक्षपणे तिची तुलना होणार आहे.  आपण सगळेच जाणतो की, काजोलची आई तनुजा आणि नूतन दोघी बहीणी आहेत. या नात्याने काजोल आणि मोहनीश बहल मावस भाऊ-बहीण आहेत आणि याच नात्याने प्रनूतनही काजोलची भाची आहे.  २५ वर्षांच्या प्रनूतनने मुंबई विद्यापीठातून बीएलएस एलएलबीची पदवी घेतली आहे़ तिला नृत्याचीही आवड आहे.
मोहनीश बहल आणि सलमान या दोघांमधलं मैत्रीचं नातं खूपच जुनं आहे. मैंने प्यार किया, हम आपके है कौन, हम साथ साथ है यासांरख्या चित्रपटात सलमान आणि मोहनीशने एकत्र काम केले आहे. हम आपके है कौन, हम साथ साथ है या दोन्ही चित्रपटांत मोहनीशने सलमानच्या मोठ्या भावाची भूमिका साकारली होती. 

Web Title: salman khan announces zaheer iqbal and pranutan bahls debut film notebook

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.