Salman Khan again in court! Get permission to go abroad! | ​सलमान खान पुन्हा कोर्टात! मिळाली विदेशात जाण्याची परवानगी!!

काळवीट शिकार प्रकरणात सध्या जामिनावर असलेला अभिनेता सलमान खान आता विदेशात जाऊ शकणार आहे. गत ५ एप्रिलला जोधपूरच्या मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने काळवीट शिकारप्रकरणी सलमानला पाच वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. यानंतरच्या दोन रात्री सलमानला तुरुंगात घालवाव्या लागल्या होत्या. सत्र न्यायालयाने जामिन मंजूर केल्यानंतर कुठे सलमान तुरुंगातून बाहेर आला होता. जामिन देताना सत्र न्यायालयाने सलमानला न्यायालयाच्या परवानगीशिवाय विदेशात न जाण्याचे बजावले होते. शिवाय येत्या ७ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण याचदरम्यान सलमानने न्यायालयात विदेशात जाण्याची परवानगी मागणारा विनंती अर्ज दाखल केला होता. या विनंती अर्जावर सुनावणी करताना न्यायालयाने सलमानला २५ मे ते १० जुलैपर्यंत कॅनडा, अमेरिका व नेपाळला जाण्याची परवानगी दिली आहे.
जामीन मिळताच सलमान खान मुंबईला परतला होता आणि आपल्या ‘रेस3’च्या शूटींगमध्ये बिझी झाला होता. आता सलमानने ‘भारत’ या नव्या चित्रपटाचे शूटींग सुरू केले आहे. या व ‘रेस3’च्या शूटींगसाठी सलमानला विदेशात जायचे आहे. पण यासाठी सलमानला न्यायालयाच्या परवानगीची गरज होती. ती परवानगी मिळाल्याने सलमानचा विदेशातील शूटींगचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 

ALSO READ : Video Goes Viral​ : अर्ध्यारात्री बॅकफ्लिप मारताना दिसला सलमान खान! पाहा, व्हिडिओ!!

अली अब्बास जफर दिग्दर्शित ‘भारत’ या चित्रपटाची कथा ‘ओड टू माई फादर’ या साऊथ कोरियायी चित्रपटावर आधारित आहे. या चित्रपटात सलमानसोबत प्रियांका चोप्रा स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.सर्वातआधी २००४ मध्ये रिलीज झालेल्या ‘मुझसे शादी करोगी’ या चित्रपटात सलमान व प्रियांका एकत्र दिसले होते. यानंतर ‘सलाम ए इश्क’ आणि ‘गॉड तुस्सी गे्रट हो’मध्ये ही जोडी एकत्र दिसली होती. ‘भारत’साठी प्रियांकाने मानधनापोटी भली मोठी रक्कम घेतल्याचे कळतेय. म्हणजेच हॉलिवूड रिटर्न देसी गर्लचे भाव वधारले आहेत.
 तूर्तास प्रियांका या चित्रपटात कुठली भूमिका साकारणार, हे गुलदस्त्यात आहे. पण सलमानच्या भूमिकेबद्दल मात्र काही रोचक माहिती समोर आली आहे. होय,५२ वर्षांचा सलमान खान ‘भारत’मध्ये १८ वर्षांचा दिसणार आहे. यासाठी खास ऐज रिडक्शन टेक्निक  वापरली जाणार आहे.  
Web Title: Salman Khan again in court! Get permission to go abroad!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.