Salman Khan to act again in Bollywood | सलमान खान ‘या’ अभिनेत्याला पुन्हा करणार बॉलिवूडमध्ये लॉन्च!

भाईजान सलमान खान याने आतापर्यंत बºयाचशा न्यू कमर्सला बॉलिवूडमध्ये ब्रेक दिला आहे. बॉलिवूडमध्ये आपले जलवे दाखवित असलेली कॅटरिना कैफ हिलादेखील सलमाननेच लॉन्च केले आहे. लेटेस्ट रिपोर्ट्सनुसार सलमान लवकरच कॅटरिनाची बहीण इसाबेल कैफ हिला बॉलिवूडमध्ये लॉन्च करणार आहे. ज्या अभिनेत्याला सलमाननेच लॉन्च केले आहे, त्याच्यासोबत सलमान इसाबेलला संधी देऊ इच्छितो. होय, या अभिनेत्याचा पहिला चित्रपट फ्लॉप झाल्याने सलमान त्याला पुन्हा एकदा संधी देणार आहे. 

गेल्यावर्षी कॅटरिनानेच बहिणीला बॉलिवूडमध्ये लॉन्च करण्यासाठी सलमानला गळ घातली होती. आता सलमान तिला लॉन्च करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. डेक्कन क्रॉनिकलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका रिपोर्टनुसार, सलमान इसाबेलला एका चित्रपटात सुरज पंचोलीबरोबर लॉन्च करणार आहे. वास्तविक तो हा चित्रपट प्रोड्यूस करणार नाही. उपलब्ध माहितीनुसार, टी सीरिजचे भूषण कुमार या चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. ‘हिरो’ या पहिल्या चित्रपटात सुरज पंचोली प्रेक्षकांचे मने जिंकण्यात अपयशी ठरला होता. या चित्रपटाला स्वत: सलमाननेच प्रोड्यूस केले होते. आता सलमान त्याला पुन्हा एकदा भूषण कुमारसोबत लॉन्च करीत आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरज आणि इसाबेलच्या करिअरवरून सलमान चिंतित आहे. अशात सलमान जेव्हा एखाद्या निर्मात्याला या दोघांची शिफारस करणार तेव्हा त्याच्याकडून नकार येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जेव्हा सलमानने एका प्रोजेक्टविषयी भूषण कुमारला सांगितले तेव्हा त्यांनी लगेचच होकार दिला. असे म्हटले जात आहे की, या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाचा अस्टिंट स्टॅनली डिकोस्टा करणार आहे. साधारणत: सहा महिन्यांनंतर या चित्रपटाच्या शूटिंंगला सुरुवात केली जाणार आहे. 
Web Title: Salman Khan to act again in Bollywood
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.