Sakshi Tanwar to give expensive gift! | ​साक्षी तन्वरला कुणी दिले महागडे गिफ्ट!

बॉक्स आॅफिसवर यशाचे झेंडे रोवणाºया ‘दंगल’मध्ये आमिर खानच्या बायकोची भूमिका साकारणारी अभिनेत्री साक्षी तन्वर सध्या जाम खूश आहे. ‘दंगल’चे यश हे तिच्या आनंदाचे कारण आहे हे सांगयलाच नको, तिच्या या यशासाठी साक्षीला एक खास गिफ्ट मिळाले हे यामुळे तिचा आनंद द्विगुणित झाला आहे. सोशल मीडियावर तिने आपल्या नव्या कोºया कारसोबत फोटो अपलोड केला आहे. म्हणे साक्षीला ही महागडी व्हॉवो कार गिफ्ट मिळाली आहे. 

दंगलमध्ये साक्षीच्या कामाची प्रशंसा झाली होती. दंगलमध्ये तिने महावीर सिंग फोगटची पत्नी दया कौर ही भूमिका साकारली होती. वयाच्या दोन टप्प्यातील भूमिका साकारण्यासाठी साक्षीने चांगलीच मेहनत घेतली होती. या भूमिकेसाठी तिने गोवºया देखील थापल्या. याचे फोटो दंगलच्या प्रदर्शनापूर्वी व्हायरल झाले होते. दंगलच्या सर्व कलावंतांच्या कौतुक होत असताना मात्र साक्षी थोडी मागे पडली की काय असे वाटत होते. दंगलच्या यशाचे सेलिब्रेशन साक्षीने आपल्या पद्धतीने करण्याचे ठरविले अन्् तिने स्वत:लाच व्हॉल्वो कंपनीची महागडी कार गिफ्ट केली. आपल्या या कारसोबतचा फोटो तिने इन्स्टाग्रामवरून शेअर केला आहे. आपल्या कामाचे कौतुक करण्याचा साक्षीचा हा फंडा सर्वांनी कॉपी करावा असाच आहे असे म्हणायला हरकत नाही. 



साक्षी तन्वर हिचा आगामी चित्रपट मोहल्ला अस्सी हा सेन्सॉरच्या कचाट्यात सापडल्याने मागील दोन वर्षांपासून रिलीजच्या प्रतिक्षेत आहे. या चित्रपटात तिने सनी देओलच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. टीव्हीवरील टॉप अ‍ॅक्टर असलेली साक्षी तन्वर राम कपूरसह लवकरच एका वेब सिरीजमध्ये पहायला मिळेल. राम कपूर व साक्षी तन्वर यांनी बडे अच्छे लगते है या मालिकेत एकत्र काम केले होते. दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. 
Web Title: Sakshi Tanwar to give expensive gift!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.