Sajid Nadiadwala will give another new face to Bollywood! 'Launched' to make this 'Girl's Girlfriend' !! | ​साजिद नाडियाडवाला बॉलिवूडला देणार आणखी एक नवा चेहरा! ‘या’ निर्मात्याच्या मुलीला करणार ‘लॉन्च’!!

सन २०१० मध्ये ‘हाऊसफुल’च्या कॉमेडी फ्रॅन्चायजीद्वारे जॅकलिन फर्नांडिसला रिलॉन्च करणारे आणि २०१४ मध्ये ‘हिरोपंती’मधून टायगर श्रॉफ आणि क्रिती सॅनन या नव्या चेह-यांना  लॉन्च करणारे निर्माते व दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला पुन्हा एक नवा चेहरा लॉन्च करणार आहेत.  सुनील शेट्टीचा मुलगा आहान याला लॉन्च करण्याची घोषणा साजिद यांनी आधीच केली आहे. आता साजिद एक नवी अभिनेत्री बॉलिवूडला देणार आहेत. होय, हितिका गलानी असे  साजिद यांच्या या नव्या हिरोईनचे नाव आहे. हितिका ही निर्माता विजय गलानी यांची मुलगी आहे. अर्थात हितिकाला साजिद कुठल्या चित्रपटातून लॉन्च करणार, हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
इकॉनॉमिक्समध्ये पदवी घेतलेली हितिका गत दीड वर्षांपासून या लॉन्चची तयारी करतेय. साहजिकच बॉलिवूड डेब्यूबद्दल ती कमालीची एक्ससाईटेड आहे. यासंदर्भात तिने सांगितले की, मी लहान असतानापासून साजिद भाई मला पाहून आहेत. त्यांनी नेहमीच  मला मुलीसारखे वागवले. पाच वर्षांपूर्वी त्यांनी मला पाहिले अन् तू अभिनेत्री बनू शकतेस, असे ते मला म्हणाले. मला ते विनोद करताहेत, असेच आधी वाटले. पण त्यांनी मला हे करिअर गंभीरपणे घेण्याचा सल्ला दिला. तेव्हापासून मी बॉलिवूड लॉन्चची तयारी करतेय. मी माझ्या डान्स व अ‍ॅक्टिंग क्लासला नियमित जाते वा नाही, याकडे त्यांचे बारीक लक्ष असते. ते नियमित माझी चौकशी करतात, असेही हितिकाने सांगितले.
साजिद तुला ‘हाऊसफुल4’मधून लॉन्च करणार का? या प्रश्नावर मात्र हितिकाने नकारार्थी उत्तर दिले. नाही, ‘हाऊसफुल4’मधून नाही. तो दुसराच चित्रपट आहे. पण तूर्तास मी त्याबद्दल काहीही सांगू शकत नाही, असे तिने सांगितले.
हितिका ही करिना कपूर खानची डाय हार्ट फॅन आहे. मी करिनाला पाहूनच मोठे झाले. बॉलिवूडसाठी स्वत:ला तयार करताना मी तिचा एकूण एक चित्रपट बघितला. ती माझा आदर्श आहे, असेही हितिका म्हणाली.

Web Title: Sajid Nadiadwala will give another new face to Bollywood! 'Launched' to make this 'Girl's Girlfriend' !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.