Sajid Nadiadwala celebrates the birthday of father of Divya Bharti! Look, photos !! | ​ साजिद नाडियाडवालाने साजरा केला दिव्या भारतीच्या वडिलांचा वाढदिवस! पाहा, फोटो!!

अभिनेत्री दिव्या भारती आज आपल्यात नाही. सन १९९३ मध्ये ५ एप्रिल रोजी दिव्याने अचानक जगाचा निरोप घेतला. मृत्यूच्या वर्षभराआधी दिव्याने साजिद नाडियाडवालासोबत गुपचूप लग्न केले होते, असे मानले जाते. मात्र लग्नाच्या काही महिन्यानंतरच दिव्याच्या रहस्यमय मृत्यू झाला होता. तिचा मृत्यू  का झाला, कसा झाला, हे रहस्य आज २५ वर्षांनंतरही कायम आहे. दिव्याच्या मृत्युकडे संशयाने पाहणारे लोक तिचा कथित पती साजिद नाडियाडवाला याला तिच्या मृत्यूसाठी जबाबदार ठरवतात. पण हे कधीच सिद्ध होऊ शकले नाही. साजिदने मात्र यानंतर अनेकदा मी दिव्यावर प्रचंड प्रेम करायचो, अशी कबुली दिलीयं. कदाचित म्हणूनचं दिव्या गेल्यानंतरही साजिद तिच्या कुटुंबाच्या खूप जवळ आहे. अलीकडे याची प्रचिती आली. होय, साजिद व त्याची पत्नी वारदा नाडियाडवाला या दोघांनी दिव्याच्या वडिलांचा ८० वा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा केला. वारदाने या बर्थ डे सेलिब्रेशनचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.  

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल पण, दिव्या वयाच्या १६ व्या वर्षी साजिदच्या प्रेमात पडली होती. ‘शोला और शबनम’ या चित्रपटाच्या सेटवर तिची साजिद नाडियाडवालासोबत ओळख झाली. साजिद या चित्रपटाच्या सेटवर गोविंदाला भेटायला गेला होता. गोविंदा हा साजिदचा खूप जवळचा मित्र. गोविंदानेच साजिद आणि दिव्याची ओळख करून दिली होती. पाहाताच क्षणी साजिद दिव्याच्या प्रेमात पडला. काही महिन्यांच्या नात्यानंतर त्या दोघांनी मे १९९२मध्ये लग्न केले. लग्न झाले त्यावेळी दिव्या केवळ १८ वर्षांची होती.

ALSO READ : ​औपचारिक घोषणा झाली, स्टारकास्टही ठरली...पण आजपर्यंत बनू शकला नाही दिव्या भारतीच्या आयुष्यावरचा हा चित्रपट!!

लग्न करण्यासाठी दिव्याने इस्लाम हा धर्म स्वीकारून तिचे नाव सना ठेवले होते,असे म्हटले जाते.  १९९३ मध्ये दिव्याच्या मृत्यूसाठी साजिदला जबाबदार ठरवले गेले. यादरम्यान साजिदच्या आयुष्यात अनेक चढऊतार आलेत. पण त्याच्या आयुष्यात दिव्यानंतर वारदा आली आणि त्याचे आयुष्यचं बदलले. साजिद व वारदाच्या लग्नाला १५ वर्षे झाली आहेत.
Web Title: Sajid Nadiadwala celebrates the birthday of father of Divya Bharti! Look, photos !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.