saira banu tweet on behalf of dilip kumar | या कारणामुळे सायरा बानू यांनी केले दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट
या कारणामुळे सायरा बानू यांनी केले दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरून ट्वीट

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या ट्विटर हँडलवरून नुकतेच सायरा बानू यांनी एक ट्वीट केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिलीप कुमार यांची पत्नी सायरा बानो यांनी दिलीप कुमार यांच्या प्रकृतीविषयी नुकतेच एक ट्वीट केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटद्वारे लोकांना एका आवाहन केले आहे. त्यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, माझ्या ‘कोहिनूर’च्या उत्तम आरोग्यासाठी आणि ते आनंदी राहावे यासाठी प्रार्थना करा असे त्यांनी त्यांच्या ट्वीटद्वारे म्हटले आहे. 
दिलीप कुमार हे गेल्या कित्येक महिन्यांपासून ट्वीटरद्वारे आपल्या फॅन्सशी संपर्कात आहेत. त्यांचे अधिकृत ट्विटर अकाऊंट फैझल फारूखी सांभाळतात. दिलीप कुमार यांच्याकडून ते नेहमी ट्विट करत असतात. पण गुरूवारी अचानक दिलीप कुमार यांच्या ट्वीटर हँडलवरून सायरा बानू यांनी काही ट्वीट केले. या ट्वीटमध्येच ‘पुढील काही ट्विट्स सायरा बानो खान यांच्याकडून केले जात आहेत’, असं सुरुवातीलाच ट्विटमध्ये स्पष्ट करण्यात आलं होते. सायरा बानू यांनी अचानकपणे ट्वीट का केले, दिलीप कुमार यांची तब्येत बरी नाहीये का असे अनेक प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडलेले होते. पण सायरा बानी यांनी ट्वीट करण्यामागे एक वेगळेच कारण होते. त्यांनीच ट्वीटद्वारे हे कारण दिलीप कुमार यांच्या चाहत्यांना सांगितलेले आहे.
‘साहब ठीक आहेत आणि घरी आराम करत आहेत. तुमचं प्रेम सतत त्यांच्या पाठीशी आहे. लाखो चाहत्यांच्या संपर्कात राहायला मला आणि साहब यांना नेहमीच आवडतं आणि गेल्या ५२ वर्षांपासून आम्ही सतत तुमच्या संपर्कात आहोत. २९ जून २०१८ रोजी मी माझ्या ‘कोहिनूर’शिवाय (दिलीप कुमार) एका कार्यक्रमात उपस्थित होती. त्यांच्याशिवाय मी फार क्वचित एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावते. असिफ फारुखी यांची मुलगी निदा हिच्या निकाहला मी गेले होते. साहबशिवाय मला तिथं एकटेपणा जाणवला, पण त्या जोडप्याला आशीर्वाद देताना आणि उपस्थितांशी संवाद साधताना मला आनंदही झाला. माझ्या ‘कोहिनूर’साठी प्रार्थना करा. त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि आनंदी जीवनासाठी प्रार्थना करा.’ असं सायरा बानो यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे.


Web Title: saira banu tweet on behalf of dilip kumar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.