Saina Nehwal's 'Believer' Actress Belongs; Know who is that? | सायना नेहवालचा ‘या’ अभिनेत्रीवर आहे विश्वास; जाणून घ्या कोण आहे ती?

गेल्या काही महिन्यांपासून बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे नाव अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्यासोबत जोडले जात आहे. सायनाच्या आयुष्यावर आधारित बायोपिकमध्ये श्रद्धा कपूर मुख्य भूमिका साकारणार आहे. तरी पण, कोण अभिनेत्री आहे जिच्यावर सायनाचा प्रचंड विश्वास आहे, असे ती सांगतेय. अहो, तुम्ही कोणताही तर्क काढण्याअगोदर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ही अभिनेत्री दुसरी तिसरी कुणी नसून स्वत: श्रद्धा कपूर आहे. तिच्या आयुष्यावर आधारित बायोपिक चित्रपटामध्ये श्रद्धा कपूर अतिशय उत्कृष्ट सायना प्रेक्षकांसमोर सादर करणार आहे, याविषयी सायनाला विश्वास वाटतो आहे. सायनाच्या व्यक्तिरेखेसाठी तिने गेल्या काही महिन्यांपासून घेतलेली मेहनत स्वत: सायनाने पाहिली आहे. 

अलीकडेच एका कार्यक्रमात चित्रपटाविषयी बोलताना सायना नेहवाल म्हणाली,‘एखाद्या क्रीडा क्षेत्रातील व्यक्तीवर चित्रपट साकारणं ही खरंच एक चांगली बाब आहे. यामुळे खेळ प्रसिद्ध होतो, लोकांपर्यंत पोहोचतो, खेळाविषयी जनजागृती होते. लहान मुलांनीही हा खेळ शिकावा, असाच संदेश जणूकाही श्रद्धा कपूरने या चित्रपटातून देण्याचा प्रयत्न केला आहे.’ 

श्रद्धा कपूर ही अभिनेत्री अत्यंत मेहनती, कोणत्याही भूमिकेसाठी जीव ओतून काम करणारी अभिनेत्री मानली जाते. त्यामुळे ती आता भारताची फुलराणी अर्थात बॅडमिंटनपटू सायना नेहवाल हिच्या जीवनावर आधारित बायोपिकमध्ये सायनाची भूमिका साकारणार आहे. सायनाची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्यासाठी तिने गेल्या काही महिन्यांपासून ट्रेनिंग सुरु केली होती. काही महिन्यांपूर्वीच दोघींचे बॅडमिंटन खेळतानाचे कोर्टवरचे फोटो व्हायरल झाले होते. हैदराबाद येथे जाऊन सायनच्या घरी जाऊन श्रद्धाने तिची भेट देखील घेतली होती. गेल्या काही दिवसांपासून श्रद्धा सायनाचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांच्याकडून प्रशिक्षण सुद्धा घेत होती. खेळाची पार्श्वभूमी नसल्याने पडद्यावर ही भूमिका साकारणे श्रद्धासाठी आव्हानात्मक होते. श्रद्धाच्या जागी या चित्रपटात दीपिका पादुकोणची वर्णी लागण्याची शक्यता आहे, अशी मध्यंतरी चर्चा रंगली होती. 

याशिवाय श्रद्धा कपूर सध्या ‘साहो’ मध्ये डबल रोल साकारणार असल्याचे ही कळते आहे. हा चित्रपट हिंदी, तामीळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज केला जाणार आहे. साहो बिग बजेट चित्रपट असून त्याचा बजेट १५० कोटी रुपये इतके आहे. श्रद्धाने यात काम करण्यासाठी १२ कोटींचे मानधन मागितले होते मात्र मेकर्सने तिला ९ कोटी रुपयांवर तडजोड करायला लावली. 

Web Title: Saina Nehwal's 'Believer' Actress Belongs; Know who is that?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.