Saif's daughter Sarah Ali Khan to appear in such a simple look in 'Kedarnath' | ​‘केदारनाथ’मध्ये अशा सिंपल लूकमध्ये दिसणार सैफची मुलगी सारा अली खान!

सैफ अली खान व अमृता सिंह यांची लाडकी लेक सारा अली खान ही आपल्या पहिल्या डेब्यू चित्रपटाबद्दल जितकी उत्सूक आहे,तितकेच चाहतेही. सारा ‘केदारनाथ’द्वारे बॉलिवूड डेब्यू करते आहे. दिग्दर्शक अभिषेक कपूर दिग्दर्शित या चित्रपटात साराचा हिरो आहे, सुशांतसिंह राजपूत. सारा व सुशांतने अलीकडे या चित्रपटाच्या शूटींगचे पहिले शेड्यूल संपवले.अभिषेक कपूर यांनी स्वत: सारा, सुशांतसोबतचा एक फोटो शेअर करत, याची माहिती दिली आहे. ‘शूटींग शानदार राहिले. डोंगरद-यांमध्ये शूटींग करणे सोपे नसते. वातावरण सतत बदलत असते. पण परमेश्वराची कृपा राहिली आणि पहिले शेड्यूल निपटले,’असे त्यांनी लिहिले. याच चित्रपटातील साराचा लूकही समोर आला आहे. या फर्स्ट लूकमध्ये सारा कमालीची सुंदर दिसतेय.  सूटमध्ये असलेली सारा घोड्यावर बसलेली आहे आणि डोक्यावर तिने छत्री पकडलेली आहे. तिच्या मागे उंच पहाड दिसत आहेत. साराचा हा फोटो अतिशय सिंपल आहे पण तरिही ‘लाजवाब’ आहे. निश्चितपणे सारा हा लूक तुम्हाला कसा वाटला, हे आम्हाला सांगायला विसरू नका.‘केदारनाथ’ हा चित्रपट एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे आणि तीर्थयात्रेशी संबधित आहे. येत्या १८ जूनमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 
मध्यंतरी सारा या चित्रपटाच्या सेटवर बरेच नखरे दाखवू लागल्याची बातमी आली होती. साराच्या नखºयांमुळे चित्रपटाचा संपूर्ण क्रू वैतागला असल्याचे यात म्हटले गेले होते. ड्रेस आणि मेकअपबद्दल जरा जास्तच सिलेक्टिव्ह असल्यामुळे शूटींगचा वेळोवेळी खोळंबा होत असल्याचेही या बातमी म्हटले गेले होते. अर्थात नंतर मेकर्सनी ही बातमी खोटी असल्याचे स्पष्ट केले होते.

ALSO READ : केदारनाथच्या सेटवर सारा अली खान दाखवतेय नखरे ?

सुशांतचा या आधी आलेला ‘राबता’ बॉक्सआॅफिसवर दणकून आपटला होता. त्यामुळे ‘केदारनाथ’कडून त्याला अधिक अपेक्षा आहेत. ‘केदारनाथ’नंतर सुशांत ‘चंदामामा दूर के’ या चित्रपटात बिझी होणार आहे. याशिवाय ‘फॉल्ट इन अवर स्टार्स’ या हॉलिवूडपटाच्या रिमेकमध्येही त्याची वर्णी लागली आहे. द ग्रेट खलीच्या बायोपिकमध्येही सुशांत दिसणार असल्याची चर्चा आहे.
Web Title: Saif's daughter Sarah Ali Khan to appear in such a simple look in 'Kedarnath'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.