Saif Ali Khan's photo leaked at the set of 'Sacred Games 2' | 'सेक्रेड गेम्स २' च्या सेटवरील सैफ अली खानचा फोटो झाला लीक
'सेक्रेड गेम्स २' च्या सेटवरील सैफ अली खानचा फोटो झाला लीक

ठळक मुद्दे सैफ अली खान मुंबईत करतोय वेब सीरीजचे शूटिंगशूटिंगदरम्यानचा सैफचा फोटो झाला लीक

'सेक्रेड गेम्स २' या वेब सीरीजच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या वेब सीरीजच्या दुसऱ्या भागाच्या चित्रीकरणालाही सुरुवात झाली आहे. यात मुख्य भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानचे चित्रीकरणादरम्यानचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या सैफ अली खान मुंबईत या वेब सीरीजची शूटिंग करतो आहे. लीक झालेल्या फोटोमध्ये सैफ सरताज सिंगच्या लूकमध्ये दिसत आहे. पहिल्या सीझनमध्येही सैफने सरताजची भूमिका निभावली होती. या वेब सीरीजच्या पहिल्या सीजनचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी आणि अनुराग कश्यप यांनी एकत्रितपणे केले होते. सेक्रेड गेम्समध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला. तसेच नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली आहे. ही वेबसीरीज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत आहे. नेटफ्लिक्सवर प्रसारीत होणाऱ्या या वेब सीरीजला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला.


सैफ ब्लॅक नाईट फिल्म्स या नावाने स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू करत आहे आणि त्याने या प्रोडक्शन हाऊस अंतर्गत कोणत्या चित्रपटाची निर्मिती करायचे हे देखील ठरवले आहे. हा सिनेमा फॅमिली कॉमेडी असेल. याचे दिग्दर्शन नितीन कक्कड करणार आहेत. या सिनेमाबाबत वृत्त आले होते की या चित्रपटात सैफसोबत सारा अली खान दिसणार आहे. मात्र आता निर्मात्यांकडून स्पष्ट समजते आहे की ते या चित्रपटासाठी नवीन चेहऱ्याच्या शोधात आहेत. सैफ आपल्या प्रोडक्शन हाऊसची सुरूवात त्याचा चांगला मित्र जय शेवाक्रमानीसोबत करत आहे. पुढील वर्षी मार्च महिन्यात सैफच्या प्रोडक्शन हाऊसचे काम सुरू होणार आहे. 


Web Title: Saif Ali Khan's photo leaked at the set of 'Sacred Games 2'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.