सैफ अली खानला बेगम करिनासोबत नाही करायचे काम, जाणून घ्या का?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 09:15 PM2018-10-22T21:15:52+5:302018-10-22T21:16:37+5:30

होय, आपल्या बेगमसोबत म्हणजेच करिनासोबत काम करण्यास सैफ तूर्तास तरी राजी नाही.

saif ali khan reveals why he refuses films with wife kareena kapoor | सैफ अली खानला बेगम करिनासोबत नाही करायचे काम, जाणून घ्या का?

सैफ अली खानला बेगम करिनासोबत नाही करायचे काम, जाणून घ्या का?

googlenewsNext

सैफ अली खान आणि करिना कपूर ही जोडी म्हणजे बॉलिवूडच्या लोकप्रीय जोड्यांपैकी एक. अनेक चित्रपटात ही जोडी दिसली आणि प्रेक्षकांच्या पसंतीत उतरली. पण येत्या काळात ही रिअल लाईफ जोडी पडद्यार एकत्र दिसणे जरा कठीण वाटते. आता आम्ही हे इतके दाव्यानिशी का म्हणतोय, तर खुद्द सैफ अली खान तसे म्हणतोय म्हणून. होय, आपल्या बेगमसोबत म्हणजेच करिनासोबत काम करण्यास सैफ तूर्तास तरी राजी नाही.
अलीकडे एका मुलाखतीत सैफ यावर बोलला. करिनासोबतचा एक चित्रपट  अलीकडे नाकारल्याचे त्याने सांगितले. शिवाय या नकारामागचे कारणही स्पष्ट केले. ‘अलीकडे मला करिनासोबत एक चित्रपट आॅफर झाला होता. पण मी करिनासोबत काम करण्यास नकार दिला. कारण मला प्रोफेशनल लाईफ आणि पर्सनल लाईफ यांची सरमिसळ नकोय. यात एक सीमारेषा मी आखलीय. आणखी एक दुसरे कारण म्हणजे, करिनासोबत मी परफॉर्म करू शकत नाही. तिच्यासमोर मला मीच बोअरिंग वाटतो. ना मी तिच्या सोबत मी स्पर्धाचं करू शकत, ना तिच्याइतकी ऊर्जा देऊ शकत,’ असे सैफ या मुलाखतीत म्हणाला.
सैफच्या या बोलण्यावरून तरी येत्या काळात सैफिनाची जोडी जमणे जरा कठीण वाटते. अर्थात सैफचे मन बदलले तर कठीण काहीही नाही.
लवकरचं सैफ अली खान ‘हंटर’ आणि ‘तानाजी’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ‘बाजार’ हा सैफचा चित्रपटही प्रेक्षकांच्या भेटीय येतो आहे. करिनाचे म्हणाल तर धर्मा प्रॉडक्शनच्या ‘तख्त’ चित्रपटात तिची वर्णी लागली आहे. याशिवाय ‘गुड न्यूज’ या चित्रपटात बेबोला अक्षय कुमारसोबत आॅनस्क्रिन रोमान्स करताना आपण पाहू शकणार आहोत.

Web Title: saif ali khan reveals why he refuses films with wife kareena kapoor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.