Saif Ali Khan made the song "Tanaji" in the beginning of the shooting, the song made in the film | सैफ अली खानने केले 'तानाजी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रीत केले गाणे
सैफ अली खानने केले 'तानाजी' चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात, चित्रीत केले गाणे

अभिनेता अजय देवगणचा बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत ‘तानाजी – द अनंसंग वॉरियर’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबत अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री काजोलदेखील झळकणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे. तसेच नुकतेच या चित्रपटातील गाण्याचे चित्रीकरण सैफने पूर्ण केले आहे. 

एका वृत्तपत्राने दिलेल्या रिपोर्टनुसार,  ‘तानाजी – द अनंसंग वॉरियर’ चित्रपटातील एका गाण्याचे चित्रीकरण नुकतेच पार पडले आहे. या चित्रपटात सैफ खलनायकाच्या भूमिकेत दिसणार असल्याचेही वृत्तात म्हटले आहे. शिवाजी महाराजांच्या या मौल्यवान सहकाऱ्यांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. त्यांच्या जीवनावर आधारीत चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'तानाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून तानाजींची शौर्यगाथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार यासाठी सगळेच उत्सुक आहेत. या चित्रपटात अभिनेता अजय देवगन तानाजींची भूमिका साकारत आहे. तर सैफ अली खानदेखील या चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. २२ नोव्हेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १५० कोटी रुपयांच्या बजेट असलेल्या या चित्रपटात शिवाजी महाराजांच्या पत्नीची भूमिका काजोल साकारणार असल्याचे म्हटले जात आहे. तर या चित्रपटात सैफ अली खान हा राजपुत मोघल किल्लेदार उदयभान राठोड यांच्या भूमिकेत असल्याची चर्चा आहे.


Web Title: Saif Ali Khan made the song "Tanaji" in the beginning of the shooting, the song made in the film
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.