चक्क सैफ अली खानने सांगितला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड, ओळखा काय असू शकतो त्याचा पासवर्ड?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2019 12:48 PM2019-05-15T12:48:46+5:302019-05-15T12:49:38+5:30

अरबाज खानच्या कार्यक्रमात सैफने त्याच्या मोबाईलचा सध्याचा पासवर्ड काय आहे याबाबत सांगितले आहे.

Saif Ali Khan just revealed what his phone password is and you wouldn't have been able to guess it | चक्क सैफ अली खानने सांगितला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड, ओळखा काय असू शकतो त्याचा पासवर्ड?

चक्क सैफ अली खानने सांगितला त्याच्या मोबाईलचा पासवर्ड, ओळखा काय असू शकतो त्याचा पासवर्ड?

googlenewsNext
ठळक मुद्देतुझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे असे विचारले असता सैफ म्हणाला माझ्या मोबाईलचा पासवर्ड चार वेळा शुन्य इतकाच आहे.

सैफ अली खानच्या सेक्रेट गेम्सच्या दुसऱ्या सिझनची त्याचे चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत. सैफ गेली अनेक वर्षं बॉलिवूडमध्ये काम करत असून त्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग आहे. दिल चाहता है, कल हो ना हो, ओमकारा, हम तुम यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. करिना कपूर सोबत त्याचे लग्न झाले असून त्यांना तैमुर हा मुलगा आहे. सैफच्या खाजगी आयुष्याविषयी जाणून घ्यायची त्याच्या चाहत्यांची नेहमीच इच्छा असते. त्याच्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे हे त्याने नुकतेच एका कार्यक्रमात सांगितले आहे.

अरबाज खानच्या चॅट शोची सध्या चांगलीच चर्चा आहे. या कार्यक्रमात नुकतीच सैफने हजेरी लावली होती. या कार्यक्रमात त्याच्या मोबाईलचा सध्याचा पासवर्ड काय आहे याबाबत सैफने सांगितले आहे. या कार्यक्रमात अरबाजने सैफला विचारले की, लग्न झालेल्या पुरुषाच्या मोबाईलला पासवर्ड असावा असे तुला वाटते का? यावर लग्न झाल्यानंतरही माझ्या मोबाईलला कधीच पासवर्ड नव्हता. सैफच्या या उत्तरावर अरबाजने लगेचच मस्करीत म्हटले की, बहुधा तुझ्याकडे एक पेक्षा जास्त फोन असतील... त्यानंतर तुझ्या मोबाईलचा पासवर्ड काय आहे असे विचारले असता सैफ म्हणाला माझ्या मोबाईलचा पासवर्ड चार वेळा शुन्य इतकाच आहे.

अरबाज खानच्या कार्यक्रमात आतापर्यंत करिना कपूर खान, वरुण धवन, नवाझुद्दीन सिद्दीकी, सनी लियोनी, करण जोहर, सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, कतरिना कैफ यांसारख्या अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली आहे. 

आगामी काळात सैफचे खूप चांगले चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तानाजीः द अनसंग वॉरियर या चित्रपटाचे सध्या सैफ चित्रीकरण करत असून जवानी जानेमन या चित्रपटात तो तब्बू आणि पूजा बेदीची मुलगी आलिया फर्निचरवाला सोबत झळकणार आहे. तसेच भूत पोलिस या कॉमेडी चित्रपटाद्वारे सैफ प्रेक्षकांना खळखळून हसवणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबतच फतिमा सना शेख आणि अली फजल यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 

Web Title: Saif Ali Khan just revealed what his phone password is and you wouldn't have been able to guess it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.