‘सेक्रेड गेम्स’चे चाहते आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:58 PM2019-06-18T12:58:25+5:302019-06-18T12:59:26+5:30

‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरच्या तुफान गाजलेल्या वेबसीरिजनंतर   याचा दुसरा पार्ट अर्थात ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण ‘सेक्रेड गेम्स 2’ची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे.

saif ali khan and nawazuddin siddiqui starrer sacred games 2 release pushed | ‘सेक्रेड गेम्स’चे चाहते आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे 

‘सेक्रेड गेम्स’चे चाहते आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी आहे 

googlenewsNext
ठळक मुद्दे‘सेक्रेड गेम्स’ चे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी दोघांनी मिळून केले होते. पण दुस-या सिझनमध्ये विक्रमादित्यची जागा नीरज घयवानने घेतली आहे.

‘सेक्रेड गेम्स’ या नेटफ्लिक्सवरच्या तुफान गाजलेल्या वेबसीरिजनंतर   याचा दुसरा पार्ट अर्थात ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी एकदा येतो, असे चाहत्यांना झाले आहे. पण ‘सेक्रेड गेम्स 2’ची प्रतीक्षा करणा-या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. होय, ताजी बातमी खरी मानाल तर ‘सेक्रेड गेम्स 2’साठी चाहत्यांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागू शकते.
‘सेक्रेड गेम्स 2’ चालू महिन्याच्या म्हणजेच जूनच्या अखेरिसपर्यंत प्रसारित होईल, असे मानले गेले होते. पण आता हे सीझन पाहण्यासाठी ऑगस्टपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार, असे दिसतेय. याचे कारण म्हणजे सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी. होय, या दोन्ही स्टार्सच्या तारखांमुळे ‘सेक्रेड गेम्स 2’ची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आल्याची शक्यता आहे.


मिड डेच्या वृत्तानुसार, सैफ सध्या लंडनमध्ये ‘जवानी जानेमन’च्या शूटींगमध्ये बिझी आहे. तर नवाजुद्दीन ‘बोले चूडियां’ या चित्रपटात व्यस्त आहे. हा चित्रपट नवाजुद्दीनचा भाऊ दिग्दर्शित करतोय. दोन्ही स्टार्सच्या बिझी शेड्यूलमुळे ‘सेक्रेड गेम्स 2’ची रिलीज डेट लांबणीवर पडत आहे.


‘सेक्रेड गेम्स’ला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद लाभला होता. ही वेबसीरिज विक्रम चंद्रा यांच्या सेक्रेड गेम्स (२००६) या कादंबरीवर आधारीत होती. नेटफ्लिक्सवर प्रसारित झालेल्या या वेबसीरिजमध्ये सैफ अली खान एका पोलिसाच्या भूमिकेत दिसला होता तर नवाजुद्दीनने गँगस्टर गायतोंडेची भूमिका साकारली होती.

‘सेक्रेड गेम्स’ चे दिग्दर्शन अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवाने यांनी दोघांनी मिळून केले होते. पण दुस-या सिझनमध्ये विक्रमादित्यची जागा नीरज घयवानने घेतली आहे. ‘सेक्रेड गेम्स’ या वेबसीरिजमधील सगळ्याच कलाकारांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. आता दुसºया सीझनमध्ये देखील तितकेच दमदार कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. 

Web Title: saif ali khan and nawazuddin siddiqui starrer sacred games 2 release pushed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.