Saeed Ali Khan gifted Baldev Ali Khan Khan for Rs 1.13 crore! You can also see photos !! | ​बालकदिनी तैमूर अली खानला डॅड सैफ अली खानने दिली १.१३ कोटींची भेट ! तुम्हीही पाहू शकता फोटो!!

नवाब सैफ अली खान यांचा मुलगा तैमूर अली खान याच्यासाठी यंदाचा बालकदिन खास ठरला. भलेही बालकदिन काय हे, तैमूरला आताश: कळत नाही. पण डॅड सैफने तैमूरसाठी यंदाचा बालकदिन खास ठरावा, यात काहीही कसर सोडली नाही. कदाचित बालकदिनाचा संदर्भ समजू लागल्यावर तैमूरला त्याचा हा पहिला बालक दिन किती खास होता, हे कळेल. होय, तैमूरला या बालकदिनी डॅडकडून एक खास भेट मिळाली. डॅडकडून मिळालेल्या या भेटीमुळे तैमूर अचानक चर्चेत आला. तैमूरला मिळालेल्या या भेटीची किंमत ऐकून अनेकांचे डोळे पांढरे झालेत. पण त्याचवेळी डॅड सैफ अली खानच्या डोळ्यांतील आनंद अनेकांनी वाचला. होय, डॅडने तैमूरला एक कार भेट दिली. या कारची किंमत किती? तर १.३० कोटी.आज मंगळवारी सैफ अली खानने एसआरटी कार खरेदी केली. या कारणची किंमत १.३० कोटी रुपए आहे. सैफ ही कार खरेदी करत होता, तेव्हाच काही पत्रकारांनी सैफला आज बालकदिनी तैमूरला काय भेट देणार? असा प्रश्न केला. यावर क्षणाचीही वाट न पाहता सैफने या कारकडे बोट दाखवले.ALSO READ: अखेर दिसला सोहा अली खानची लेक इनायाचा चेहरा! डॅड कुणाल खेमूने बालकदिनी शेअर केला फोटो!

तैमूरची सुरक्षा माझ्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. त्यामुळे ही कार मी तैमूरला भेट देणार आहे. या कारच्या बॅक सीटवर बेबी सीट आहे. तैमूरच्या सुरक्षेसाठी यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकेल? तैमूरसाठी बालकदिनाची ही सर्वात चांगली भेट असेल. तैमूरसोबत या कारची फर्स्ट राईड घेण्यासाठी मी आतूर आहे. या कारचा चेरी रेड कलरही तैमूरला आवडेल. मी ही कार त्याच्यासाठी ठेवेल, असे सैफने यावेळी सांगितले.
त्यामुळे ११ महिन्यांच्या तैमूरला तुम्ही लवकरच या कारची सैर करताना पाहू शकणार आहात. या कारमधील तैमूरच्या फर्स्ट राईडचे फोटो तुम्हाला बघायला मिळतीलच. पण तोपर्यंत अर्थातच प्रतीक्षा.

Web Title: Saeed Ali Khan gifted Baldev Ali Khan Khan for Rs 1.13 crore! You can also see photos !!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.