Sacred Games Memes: ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो पाहून क्रेजी झालेत फॅन्स! पाहा, फनी मीम्स!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 12:22 PM2019-05-07T12:22:07+5:302019-05-07T12:22:19+5:30

‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज होताच प्रेक्षक क्रेजी झाले आहेत. इतके की, सोशल मीडियावर ‘सेक्रेड गेम्स 2’वरच्या मजेदार मीम्सचा पाऊस पडतोय.

sacred games2 teaser hilarious memes on nawazuddin siddiqui pankaj tripathi | Sacred Games Memes: ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो पाहून क्रेजी झालेत फॅन्स! पाहा, फनी मीम्स!!

Sacred Games Memes: ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो पाहून क्रेजी झालेत फॅन्स! पाहा, फनी मीम्स!!

googlenewsNext
ठळक मुद्दे अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित केलेली ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या  ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित आहे.

‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो रिलीज होताच प्रेक्षक क्रेजी झाले आहेत. इतके की, सोशल मीडियावर ‘सेक्रेड गेम्स 2’वरच्या मजेदार मीम्सचा पाऊस पडतोय. अर्थात हाही ‘सेक्रेड गेम्स 2’ला ‘वेलकम’ करण्याचाच एक भाग आहे. मुळात ‘सेक्रेड गेम्स 2’ कधी एकदा येते, असे चाहत्यांना झाले आहे.  
 अभिनेता सैफ अली खान आणि नवाजुद्दीन सिद्दीकी यांची भूमिका असलेली नेटफ्लिक्सची फर्स्ट ओरिजनल इंडियन सीरिज ‘सेक्रेड गेम्स’ प्रचंड गाजली. ही पहिली सीरिज संपत नाही, तोच प्रेक्षक ‘सेक्रेड गेम्स’च्या दुस-या सीझनची आतुरतेने प्रतीक्षा करू लागले होते. काल नेटफ्लिक्सने ‘सेक्रेड गेम्स 2’चा प्रोमो प्रदर्शित केला आणि चाहत्यांच्या उत्साहाला उधाण आले.  हा प्रोमो येताच व्हायरल झाला. सोबत एकापेक्षा एक मजेदार  मीम्सचाही पूर आला.




‘सेक्रेड गेम्स 2’च्या या नव्या प्रोमोत सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, पंकज त्रिपाठी यांच्यासोबत रणवीर शौरी व कल्की कोच्लिन दिसले. पहिल्या सीझनमध्ये नवाजुद्दीन आणि पंकज त्रिपाठी यांची भूमिका प्रेक्षकांना कमालीची भावली होती. दुसºया सीझनमधील त्यांचे नवे लूक पाहून चाहत्यांचे क्रेज वाढले. विशेषत: पंकज त्रिपाठी यांचे नवे लूक पाहून अनेकांनी त्यांचा फोटो शेअर करत, आपआपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या. हा तोच मित्र आहे, जो स्वत: सिंगल राहतो आणि इतरांना रिलेशनशिपचा सल्ला देतो, असे अनेक युजरने लिहिले.




एका युजरने सीआयडीतील इन्स्पेक्टर दयाचा फोटो शेअर करत, ‘नव्या सीझनच्या प्रतीक्षेत,’ असे कॅप्शन दिले.
अद्याप ‘सेक्रेड गेम्स 2’ च्या रिलीज डेटची घोषणा झालेली नाही. ‘सेक्रेड गेम्स 2’मध्ये किती एपिसोड असणार, ते कधी टेलिकास्ट होणार, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.  २०१८ मध्ये या सीरिजचे पहिले सीझन आले होते. अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित केलेली ही सीरिज विक्रम चंद्रा यांच्या  ‘सेक्रेड गेम्स’ या कादंबरीवर आधारित आहे. पहिल्या सीझनमध्ये   गणेश गायतोंडेचा मरताना दाखवले होते. पण  ‘सेक्रेड गेम्स 2’ तो परतताना दिसतोय. साहजिकचं चाहते खूश आहेत. गणेश गायतोंडे ही भूमिका अभिनेता नवाजुद्दीनने साकारली होती. सैफ अली खान यात मुख्य भूमिकेत होता.  




 











 

Web Title: sacred games2 teaser hilarious memes on nawazuddin siddiqui pankaj tripathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.